क्रीडा संकुलासाठी २६ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:45 AM2017-10-14T01:45:46+5:302017-10-14T01:45:58+5:30
उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथे मोठ्या ताजबागच्या बाजूला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथे मोठ्या ताजबागच्या बाजूला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे. कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शुक्रवारी या कामासाठी २६ कोटी रुपये मंजूर केले. आॅलिम्पिक दर्जाच्या सोई असणारे क्रीडा संकुलाच्या रूपात दक्षिण नागपूरला दिवाळीची भेट मिळाली आहे.
या क्रीडा संकुलाच्या कामाबाबत शुक्रवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत आमदार सुधाकर कोहळे, सहसचिव (कामगार) अरुण विधळे, कामगार मंत्र्यांचे खासगी सचिव मारुती मोरे, अवर सचिव संजीव गुप्ते, कल्याण आयुक्त सतीश दाभाडे, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता संजय चिमुरकर, वास्तुशास्त्रज्ञ शशी प्रभू, प्रकल्पाचे कंत्राटदार नीलेश जामदार आदी उपस्थित होते. या क्रीडा संकुलाचे काम २००४ मध्ये हाती घेण्यात आले होते. तांत्रिक कारणास्तव हा प्रकल्प २०१० पासून रखडला होता. मौजा हरपूर येथे ९.५० एकर जागेवर उभारण्यात येणाºया या प्रकल्पामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून उदयोन्मुख खेळाडूंना अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी विधानसभेत या क्रीडा संकुलाचे काम रखडल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. नागपुरातील क्रीडा विकाससाठी काम लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन दिले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाबाबत बैठक झाली होती. त्यात मंडळाच्या शासनाकडे असलेल्या थकीत निधीतून या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या निधीतून प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. तूर्तास मंडळाकडे असलेल्या संचित निधीतून प्रकल्पाचे काम सुरू करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली असून याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी दिले आहेत. २००४ मध्ये हाती घेण्यास आलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत १२ कोटी होती. प्रकल्पाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प मार्गी न लागल्यास त्याच्या किमतीत वाढ होत राहील, ही बाब लक्षात घेता या प्रकल्पातील अडथळे दूर करावे व उर्वरित कामासाठी कालमर्यादा निश्चित करावी. तसेच क्रीडा संकुल उभारताना जागतिक दर्जार्चेिनकष पाळण्यात यावेत, अशा सूचना कामगार मंत्र्यांनी केल्या.