नागपूर विभागात लागणार २.६२ कोटी वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:33 AM2018-06-02T01:33:39+5:302018-06-02T01:33:51+5:30

१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.

2.62 crore trees will be planted in Nagpur division | नागपूर विभागात लागणार २.६२ कोटी वृक्ष

नागपूर विभागात लागणार २.६२ कोटी वृक्ष

Next
ठळक मुद्देअनुप कुमार : उपजीविकेचे साधन ठरणाऱ्या वृक्षावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर: १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासंदर्भातील नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.
यात नागपूर जिल्ह्याला ४३ लाख ४४ हजार, वर्धा ३३ लाख ०७ हजार, भंडारा २४ लाख ५९ हजार, गोंदिया ३४ लाख ६० हजार, चंद्रपूर ७७ लाख २१ हजार तर गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्षलागवडीसाठी १९ हजार ७३१ जागा निवडण्यात आल्या असून त्यावर १ कोटी ५४ लाख ८५ हजार खड्डे खोदण्यात आले आहे. मोहिमेसाठी ३ कोटी ६२ लाख ७१ हजार वृक्ष उपलब्ध आहेत. या मोहिमेमध्ये उपजीविकेचे साधन म्हणून उपयोगात येणाºया वृक्षांचा समावेश करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जनजागृतीसह १५ जूनपासून ‘एक विद्यार्थी एक झाड’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्यावतीने ‘एक कर्मचारी तीन रोपटे’ तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘आॅक्सिजन पार्क’ची संकल्पना राबिवण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थेच्या मदतीने वर्धा जिल्ह्यात ‘झाडांचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री बालोद्यान’ तसेच गोंदिया जिल्ह्यात मामा तलावाच्या सभोवताल वड, पिंपळ व उंबराच्या झाडाचे रोपण करण्यात येणार आहे.

Web Title: 2.62 crore trees will be planted in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.