२,६२८ बाधित, २८ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:09 AM2021-04-09T04:09:17+5:302021-04-09T04:09:17+5:30
सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ...
सावनेर/ काटोल/ कळमेश्वर/ हिंगणा / मौदा / रामटेक / उमरेड/ नरखेड/ कुही/ रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग दुपटीने वाढला आहे. गुरुवारी तेरा तालुक्यांत २,६२८ रुग्णांची नोंद झाली, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला.
सावनेर तालुक्यात पहिल्यांदाच ४४६ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १८३, तर ग्रामीण भागात २६३ रुग्णांची भर पडली.
काटोल तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे. तालुक्यात ७४५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २४० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ८५, तर ग्रामीण भागातील १५५ रुग्णांचा समावेश आहे.
कुही तालुक्यात ८९ रुग्णांची भर पडली. मांढळ व नवेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५३८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कुही येथे २१, मांढळ (२४), वेलतूर (३८), साळवा (४), तर तितूर येथे दोन रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील सोनपुरी गाव कोरोना हाटस्पॉट ठरले आहे. २२५ लोकसंख्या असलेल्या या गावात बाधितांची संख्या ६१ इतकी आहे.
उमरेड तालुक्यात ७६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३०, तर ग्रामीण भागातील ४६ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात १६९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर- ब्राह्मणी न. प. क्षेत्रातील १८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १५१ रुग्णांची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात ४७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ९, तर ग्रामीण भागातील ३८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५०, तर शहरातील ७८ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत २६, मेंढला (३), जलालखेडा (४), तर मोवाड येथे ५ रुग्णांची नोंद झाली. मौदा तालुक्यात ५५ रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १४७० इतकी झाली आहे. यात ९७४ रुग्ण कोरोेनामुक्त झाले. सध्या ४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगण्यात ग्राफ वाढला
हिंगणा तालुक्यात १३७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६८ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील मृत्यूसंख्या १४५ इतकी झाली आहे. गुरुवारी वानाडोंगरी येथे ९२, डिगडोह (४५), हिंगणा (१७), इसासनी (१७), टाकळघाट (३), निलडोह (२८), गुमगाव (१२), शिवमडका (१०), भारकस (८), रायपूर (४), कान्होलीबारा (५), वागधरा (२), ऐरणगाव (७), अडेगाव (४) शिरुळ (३), जुनेवानी २, तर धानोली, कवडस, आमगाव, उमरीवाघ, मोंढा, देवळी सावंगी, नागलवाडी, गौराळा, मेटाउमरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.