नागपुरातील एफसीआय परिसरातील २७ झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:34 AM2020-06-16T00:34:56+5:302020-06-16T00:37:07+5:30
पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे.
एफसीआयने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता २७ झाडे तोडली आहेत. यात कडुलिंब, सुबाभूळ व अन्य झाडांचा समावेश आहे. वास्तविक कोणत्याही प्रकारचे झाड तोडावयाचे असल्यास मनपाच्या उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी देताना एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे बंधनकारक आहे. परंतु एफबीआयने अशी कुठलीही परवानगी न घेता झाडे तोडलेली आहेत. यासंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एफसीआय व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.
झाडांची कत्तल केल्यासंदर्भात नागरिकांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. संबंधितावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त व उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली.