२७९ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:23+5:302021-02-09T04:11:23+5:30

नागपूर : कोरोनाबाधितांचा वेग मंदावला असला तरी दैनंदिन २५० ते ३५० रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता व्यक्त केली जात ...

279 positive, 5 deaths | २७९ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू

२७९ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू

Next

नागपूर : कोरोनाबाधितांचा वेग मंदावला असला तरी दैनंदिन २५० ते ३५० रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात सध्या २,४३२ तर ग्रामीण भागात ७९९ कोरोनाचे सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) रुग्ण आहेत. या रुग्णांकडे लक्ष न ठेवल्यास त्यांच्याकडून कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमवारी २७९ नव्या रुग्णांची भर पडली तर, ५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,३६,३७७ तर मृतांची संख्या ४,१९७ वर गेली.

नागपूर जिल्ह्यात आज २,७८८ आरटीपीसीआर व ७०३ रॅपिड अँटिजेन अशा एकूण ३,४९१ चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरमधून २४३ तर अँटिजेनमधून ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील २४५, ग्रामीण भागातील ३२ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २, ग्रामीणमध्ये १ तर जिल्हाबाहेरील २ रुग्ण आहेत. आज २७१ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,२८,९४९ झाली असून, याचे प्रमाण ९४ टक्क्यावर गेले आहे. कोरोनाचा सक्रिय असलेल्या रुग्णांमध्ये ८८९ रुग्ण विविध रुग्णालयात भरती असून, २,३४२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-मेयो, मेडिकलमध्ये २,९७० रुग्णांचे बळी

कोरोनाच्या ११ महिन्याचा काळात मेयोमध्ये १३९७, मेडिकलमध्ये १५७३ असे एकूण २,९७० रुग्णांचे बळी गेले. जिल्ह्यात एकूण मृतांच्या तुलनेत साधारण ७० टक्के मृत्यू या दोन रुग्णालयात झाले आहे. यामागे गंभीर झाल्यानंतरच उपचारासाठी आलेले रुग्ण, अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब व श्वसनाचा विकार असलेल्या रुग्णांची मोठी संख्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- दैनिक संशयित : ३,४९१

-बाधित रुग्ण : १३६३७७

_-बरे झालेले : १,२८,९४९

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३,२३१

- मृत्यू : ४,१९७

Web Title: 279 positive, 5 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.