२८ लाभार्थ्यांना मिळाले घरकुलांचे ताबापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:07 AM2021-03-01T04:07:34+5:302021-03-01T04:07:34+5:30
प्रधानमंत्री आवास योजना : नामप्रविप्रतर्फे वाटप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (शहर) ...
प्रधानमंत्री आवास योजना : नामप्रविप्रतर्फे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (शहर) लोकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावीत, यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेल्या घरकुलांचे ताबापत्र देण्यात येत आहे. मौजा तरोडी (खुर्द) ६३, सिम्बॉयसिस कॉलेजजवळ उभारण्यात आलेल्या घरुकुलांपैकी २८ लाभार्थ्यांना घरकुलांचे ताबापत्र देण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘नामप्रविप्रा'ने तयार केलेल्या एकूण घरकुलांपैकी आतापर्यंत मौजा वाठोडा येथे १५१, मौजा वांजरी येथे भूखंड क्रमांक १ मध्ये ५ व भूखंड क्रमांक २ मध्ये २५ आणि तरोडी (खुर्द) ६३ मधील २८ घरकुलांचे असे एकूण २०९ लाभार्थ्यांना सदनिकांचे हस्तानंतरण करण्यात आले आहे.
मौजा तरोडी (खुर्द) येथे खसरा क्रमांक ६३ मध्ये तयार घरकुलांसाठी ५२५ लाभार्थ्यांपैकी १२० लाभार्थ्यांनी घरकुलांची संपूर्ण रक्कम जमा केलेली आहे. या १२० लाभार्थ्यांपैकी २८ लाभार्थी वगळता उर्वरित ९२ लाभार्थ्यांना येत्या १५ दिवसात घरकुलांचे ताबापत्र देण्याचा ‘नामप्रविप्रा'चा मानस आहे. मौजा तरोडी (खुर्द)मधील उर्वरित रक्कम जमा न केलेल्या ४०५ लाभार्थ्यांनी व इतर ठिकाणीही घरकुलांची संपूर्ण रक्कम जमा न केलेल्या अशा सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलांची संपूर्ण रक्कम जमा करून घरकुलांचा ताबा घेऊन सदर घरकुलावर आपला नावाचेच शिक्कामोर्तब करावे, असे आवाहन नामप्रविप्रा केले आहे.
गुडीपाडवा सोडत २०२१ साठी उपलब्ध असलेल्या सदनिकांसाठी नव्याने आवेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत लाभार्थ्यांना या घरकुलांसाठी अर्ज करता येणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज करावे, असे आवाहन ‘नामप्रविप्रा’चे आयक्त व ‘नासुप्र’चे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.