28 लाखांची हेरॉईन, गांजा आगीच्या हवाली
By admin | Published: July 2, 2017 02:43 PM2017-07-02T14:43:51+5:302017-07-02T14:43:51+5:30
28 ग्राम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 9क्क् ग्राम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध भागात जप्त केलेली 28 ग्राम हेरॉईन, 93 किलो गांजा आणि 1 किलो 9क्क् ग्राम चरससह अंमली पदार्थांचा साठा आग लावून पेटवून देण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी हिंगणा परिसरात हा साठा नष्ट केला.
तहसील, इमामवाडा, एमआयडीसी अजनी, सक्करदरा, कळमना, यशोधरानगर, जरीपटका, गिट्टीखदान, प्रतापनगर, नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रु पयांचे अंमली पदार्थ पकडले. ठराविक मुदतीननंतर ते नष्ट केले जातात. तत्पूर्वी कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी तीन पोलीस उपायुक्तांची समिती निर्माण केली होती. त्यात उपायुक्त संभाजी कदम (गुन्हे शाखा), उपायुक्त सुहास बावचे ( प्रशासन) आणि उपायुक्त श्वेता खेडकर (ईओडब्ल्यू) यांचा समावेश होता. या अधिका:यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांची शहानिशा केल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी नियमावली तयार करून दिली. त्यानंतर सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तो अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहका:यांनी हिंगणा परिसरात लाखो रु पयांचा अंमली पदार्थाचा साठा जाळून नष्ट केला.