फोर्थ लाईनच्या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या २८ रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 10:33 PM2021-12-22T22:33:40+5:302021-12-22T22:34:12+5:30

Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील ब्रजरानगर-ईब स्टेशन दरम्यान फोर्थ लाईनच्या कनेक्टिव्हिटीचे काम २४ ते ३० डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या २८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

28 trains running via Nagpur canceled due to 4th line work | फोर्थ लाईनच्या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या २८ रेल्वेगाड्या रद्द

फोर्थ लाईनच्या कामामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या २८ रेल्वेगाड्या रद्द

Next

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील ब्रजरानगर-ईब स्टेशन दरम्यान फोर्थ लाईनच्या कनेक्टिव्हिटीचे काम २४ ते ३० डिसेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या २८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयानुसार २४ डिसेंबरला १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, २६ डिसेंबरला १२८६९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस, २७ डिसेंबरला १२७६७ नांदेड-सांतरागाछी एक्स्प्रेस, २९ डिसेंबरला १२७६८ सांतरागाछी-नांदेड एक्स्प्रेस, २८ डिसेंबरला २०९१७ इंदुर-पुरी एक्स्प्रेस, ३० डिसेंबरला २०९१८ पुरी-इंदुर एक्स्प्रेस, २४ डिसेंबरला २२८४३ बिलासपूर-पटना एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. तसेच २६ डिसेंबरला २२८४४ पटना-बिलासपूर, २४ आणि २५ डिसेंबरला १२८१२ हटिया-कुर्ला एक्स्प्रेस, २६ आणि २७ डिसेंबरला १२८११ कुर्ला-हटिया एक्स्प्रेस, २६ डिसेंबरला २०७४१ बिकानेर-पुरी एक्स्प्रेस, २९ डिसेंबरला २०७४२ पुरी-बिकानेर एक्स्प्रेस, २८ डिसेंबरला २२८६६ पुरी-कुर्ला एक्स्प्रेस, ३० डिसेंबरला २२८६५ कुर्ला-पुरी एक्स्प्रेस, २५ डिसेंबरला २२५१२ कामाख्या-कुर्ला एक्स्प्रेस, २८ डिसेंबरला २२५११ कुर्ला-कामाख्या एक्स्प्रेस, २६ डिसेंबरला १२८१० हावडा-मुंबई एक्स्प्रेस, २८ डिसेंबरला १२८०९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस, २२, २३ आणि २९ डिसेंबरला १२१५१ कुर्ला-शालिमार एक्स्प्रेस, २४, २५ आणि ३१ डिसेंबरला १२१५२ शालिमार-कुर्ला एक्स्प्रेस, २४ डिसेंबरला १२९४९ पोरबंदर-सांतरागाछी एक्स्प्रेस, २६ डिसेंबरला १२९५० सांतरागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस, २४, २५ आणि २८ डिसेंबरला २०८०७ विशाखापट्टनम-अमृतसर एक्स्प्रेस, २५, २६ आणि २९ डिसेंबरला २०८०८ अमृतसर-विशाखापट्टनम एक्स्प्रेस, २३, २७ आणि ३० डिसेंबरला १२८८० भुवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस, २५, २९ डिसेंबर आणि १ जानेवारीला १२८७९ कुर्ला-भुवनेश्वर एक्स्प्रेस, २३ आणि ३० डिसेंबरला २२८९४ हावडा-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, २५ डिसेंबर आणि १ जानेवारीला २२८९३ साईनगर शिरडी-हावडा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

ही गाडी धावणार पॅसेंजरच्या रुपाने

रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने २४ आणि ३० डिसेंबरला १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेसला झारसुगडा-रायगड दरम्यान पॅसेंजरच्या रुपाने चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

...........

Web Title: 28 trains running via Nagpur canceled due to 4th line work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.