चार वर्षात २८२९ घटस्फोट

By admin | Published: September 30, 2015 06:24 AM2015-09-30T06:24:16+5:302015-09-30T06:24:16+5:30

फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरातून वैवाहिक जीवनाचे बंध तुटत आहेत. अनेकांच्या संसाराचा

28,2 9 divorce in four years | चार वर्षात २८२९ घटस्फोट

चार वर्षात २८२९ घटस्फोट

Next

नागपूर : फेसबुक, व्हॉटस्अप या सोशल नेटवर्किंगच्या स्वैर वापरातून वैवाहिक जीवनाचे बंध तुटत आहेत. अनेकांच्या संसाराचा प्रारंभ बिंदूच अखेरचा ठरत आहे. संसाराची नाव पैलतीरावर पोहोचण्यापूर्वी तडे जात आहेत. पती-पत्नीच्या एकत्र सहमतीने दररोज सरासरी तीन जोडप्यांचे विवाहसंबंध विच्छेदित होत आहे. या भयावह स्थितीने विवाहसंस्थाच आता धोक्यात आली आहे. १ जानेवारी २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत नागपूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी ३२९० प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी २८२९ प्रकरणांत न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला आहे. अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब पुढे आली आहे. वर्षनिहाय आकडेवारीनुसार, २०१२ मध्ये ७९४, २०१३ मध्ये ८८९, २०१४ मध्ये ९२९ तर, १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत ६७८ प्रकरणे घटस्फोटासाठी दाखल झाली होती. या काळात अनुक्रमे ८०९, ७८८, ७७८ व ४५४ प्रकरणात घटस्फोट मंजूर झाले. (प्रतिनिधी)

अशी आहे अन्य आकडेवारी
४संबंधित काळात आपसी सहमतीने घटस्फोट मिळण्यासाठी १८२८, स्त्रीधनासाठी २२७, पोटगीसाठी ३६४ तर, मुलांच्या ताब्यासाठी २३५ दावे दाखल झाले होते. ३१ आॅगस्टपर्यंत एकूण ७२६१ प्रकरणे प्रलंबित होते. यात ५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ४८ तर, १० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३ प्रकरणांचा समावेश आहे. एकूण प्रकरणांपैकी २३४३ प्रकरणांत पोटगी व स्त्रीधन मंजूर झाले.

समुपदेशनाचा लाभ
योग्य समुपदेशन व इतर कारणांमुळे अनेक दाम्पत्यांचे विवाहबंधन कायम राहिले. २०१२ मध्ये २११, २०१३ मध्ये २६७, २०१४ मध्ये २२२ तर, १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत १६९ प्रकरणांत घटस्फोट टळले. याप्रकरणातील दाम्पत्यांची मने जवळजवळ दुरावली होती. ते एकमेकांसोबत राहण्यास तयार नव्हते. एकत्र बसवून वाद मिटविल्यामुळे घटस्फोटाचा विचार मागे पडला.

Web Title: 28,2 9 divorce in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.