२८.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:50+5:302021-02-05T04:41:50+5:30
केळवद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-सावनेर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला. ...
केळवद : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर-सावनेर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील खुर्सापार शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला. यात पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६० जनावरांची सुटका करीत एकूण २८ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये इलियास जमालउद्दीन (२५, रा. पसाैडा, जिल्हा गाझियाबाद, उत्तर प्रदेश), अफजल खान अनवर खान (२३, रा. लक्ष्मीनगर, ता. देरसिया मध्य प्रदेश), वसीम खानसैयम खान (२७, रा. भाेरासा, मध्य प्रदेश), शकील अब्दुल रहेमान कुरेशी (३४, रा. माेहगाव हवेली, ता. साैंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) व माेबीद खान खालीद खान पठाण (१९, रा. लायरा, ता. काेरबा, जिल्हा विदिशा, मध्य प्रदेश) या पाच जणांचा समावेश आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक केळवद (ता. सावनेर) परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना मध्य प्रदेशातून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरील खुर्सापार (ता. सावनेर) शिवारातील आरटीओच्या चेकपाेस्टजवळ नाकाबंदी केली. यात त्यांनी एमपी-०४/एचई-९६०५ क्रमांकाचा कंटेनर थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना ६० जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले. ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कंटेनरमधील पाचही जणांना अटक केली. शिवाय, गुरांची सुटका करीत कंटेनर जप्त केला. या कारवाईमध्ये २० लाख रुपयांचा कंटेनर आणि ८ लाख ८५ हजार रुपये किमतीची ६० जनावरे असा एकूण २८ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
दरम्यान, केळवाद पाेलिसांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एचआर-३८/यू-७८५६ क्रमांकाचा कंटेनर पकडला. यात जाहीर शाहीद पठाण (२६, रा. दलाेदा, ता. मंदसाेर, मध्य प्रदेश), चांद माेहम्मद सखूर खाॅ (३५, रा. इंदिरा काॅलनी, मंदसाेर, मध्य प्रदेश) या दाेघांना अटक केली. या कंटेनरमध्ये ५० जनावरे हाेती. या गुरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये ठेवण्यात आल्याचेही तसेच कंटेनर झाहीर शेख महसूद कुरेशी, रा. भाेपाळ, मध्य प्रदेश याच्या मालकाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, राजेंद्र रेवतकर तसेच केळवद पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.