पोलिसांवर हल्ला करणाऱ्या २९ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:56+5:302021-05-05T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करणाऱ्या ५० आरोपींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करणाऱ्या ५० आरोपींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी २९ जणांना अटक करण्यात आली, त्यात सहा महिलांचा समावेश आहे. राहाटे टोली भागात हातभट्टीची दारू गाळणाऱ्या तसेच तेथे जुगार अड्डे भरवणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी अजनी पोलिसांचे पथक सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पोहोचले होते. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेताच तेथील महिला,पुरुषांनी पोलिसांवर हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. या दगडफेकीत पोलिसांसोबत सुरक्षेसाठी असलेल्या प्रिया रामाजी निकोडे, शिल्पा सुरेश मेंढे आणि भाग्यश्री मनोहर डोडेवार या तीन महिला होमगार्ड जखमी झाल्या. यानंतर अजनी पोलिसांनी मदतीसाठी दंगा नियंत्रण पथकासह मोठा पोलीस ताफा बोलवून घेतला. आरोपींची धरपकड सुरू होताच त्या भागातील महिला, मुलांनी त्याचा जोरदार विरोध केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. ती परिस्थिती हाताळत पोलिसांनी पहाटे ३ वाजेपर्यंत २३ जणांना आणि मंगळवारी दुपारी पुन्हा सहा महिलांना अटक केली. त्यांच्या २५ ते ३० साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
----
दारूच्या अनेक भट्ट्या उद्ध्वस्त
अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, ठाणेदार विनोद चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज सकाळी १०.३० वाजतापासून या भागात पुन्हा कारवाई सुरू केली. सहा दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि सुमारे १० ते १२ लाख रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
---
अटक करण्यात आलेले आरोपी कुणाल लखोटे, निखिल टिपले, सोनू पाटील, नयन हावरे, अल्ताफ लोंढे, अनिकेत पात्रे, प्रवीण लोंढे, कन्ना हातागडे, श्रावण नाडे, आकाश नाडे, धीरज शेंडे, वतन नाडे, पंकज, ईश्वर लोंढे, संदीप मानकर, दारासिंग लोंढे, जितेंद्र नाडे, वसंत लोंढे, सोहन उफाडे, सावन मानकर, कैलास हातागडे, प्रताप हातागडे, उमेश मानकर तसेच सहा महिला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
---