स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील २९ वृद्ध कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:01+5:302021-04-22T04:09:01+5:30
सावनेर : सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४६ पैकी २९ वृद्धांना कोरानाची लागण झाली आहे. यातील ८ वृद्धांना सावनेर ...
सावनेर : सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४६ पैकी २९ वृद्धांना कोरानाची लागण झाली आहे. यातील ८ वृद्धांना सावनेर येथील शासकीय कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ. संदीप गुजर यांनी दिली.
सावनेर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. अशातच स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमाला कोरोनाने विळखा घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र प्रशासनाने प्राथमिकता देऊन तातडीने लसीकरण केले नाही असा व्यवस्थापनाचा आरोप आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने या वृद्धाश्रमाला कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या नाही. या वृद्धाश्रमात ऑक्सिजन सिलिंडर, महत्त्वाच्या औैषधी नाहीत. यासंदर्भात हे वृद्धाश्रम संचालित करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज टेक्निकल अॅण्ड एज्यूकेशन सोसायटीचे सचिव युगांत कुंभलकर यांना विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला. वृद्धांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.