बंदी असलेल्या २९३ पीओपी मूर्ती जप्त()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:11 AM2021-09-10T04:11:22+5:302021-09-10T04:11:22+5:30
मनपाच्या एनडीएस पथकाची कारवाई : ४ लाख १२ हजार दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध ...
मनपाच्या एनडीएस पथकाची कारवाई : ४ लाख १२ हजार दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने दोन दिवसात शहराच्या विविध भागांतून २९३ पीओपी मूर्ती जप्त केल्या. ४ लाख १२ हजारांचा दंड वसूल केला.
बंदी असलेल्या पीओपी मूर्ती विक्रेत्यांच्या विरोधात मनपाद्वारे शहरात कारवाई केली जात आहे. बुधवारी १८५ पीओपी मूर्ती जप्त करून २ लाख २ हजार तर गुरुवारी १०८ पीओपी मूर्ती जप्त करून २ लाख १० हजार दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे.
गुरुवारी शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोनमधील २७२ दुकानांची तपासणी करण्यात आली. १०८ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक ६९ हजार रुपये दंड हनुमाननगर झोनअंतर्गत वसूल केला. या झोनमधील ५५ दुकानांची तपासणी करून ५३ पीओपी मूर्ती जप्त केल्या. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
..
झोननिहाय कारवाई
झोन दुकाने तपासली मूर्ती जप्त दंड वसूल(हजार)
लक्ष्मीनगर ४२ ४० ४५
धरमपेठ ४० ३२ २६
हनुमाननगर ८० ६३ ९७
धंतोली ८५ ९ ३७
नेहरूनगर ७२ १० २७
गांधीबाग २६ १३ १३
सतरंजीपुरा ३३ ९ १५
लकडगंज ५६ ७६ ३४
आशीनगर १९ १ २८
मंगळवारी २५ ५ ३०
एकूण ५२२ २९३ ४,१२,०००