२९६ एसटी बसेस झाल्या`कोरोना फायटर`

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:25 PM2021-09-16T16:25:55+5:302021-09-16T16:27:03+5:30

एसटी महामंडळाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवाशांना बाधा होऊ नये यासाठी एसटी बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटींग केले आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा या बसेसला कोटींग करण्यात येणार असून सध्या २९६ बसेस कोरोना फायटर म्हणून प्रवाशांना सेवा पुरवित आहेत.

296 ST buses became Corona Fighter | २९६ एसटी बसेस झाल्या`कोरोना फायटर`

२९६ एसटी बसेस झाल्या`कोरोना फायटर`

Next
ठळक मुद्देअँटी मायक्रो बिअल कोटींग झाले पूर्ण : प्रवासी करू शकणार बिनधास्त प्रवास

दयानंद पाईकराव

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटींग करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ४३४ बसेसपैकी २९६ बसेसला ही कोटींग करण्यात आली आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा या बसेसला कोटींग करण्यात येणार असून सध्या २९६ बसेस कोरोना फायटर म्हणून प्रवाशांना सेवा पुरवित आहेत.

किती बसेसना झाले कोटींग ?

आगार                       --                  एकूण बसेस कोटींग झालेल्या बसेस

-गणेशपेठ (८०)            --                          ६५

-घाट रोड (६४)             --                          ४४
-इमामवाडा (५५)          --                          ३४

-वर्धमाननगर (४१)         --                         ३३
-काटोल (५३)               --                         ३३

-सावनेर (५०)               --                         ३४
-उमरेड (४८)                --                        २४

-रामटेक (४२)               --                         २९

एका एसटीला दोन महिन्यातून एकदा होणार कोटींग 

एसटी बसमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी अँटी मायक्रो बिअल कोटींग करण्यात आले आहे. हे कोटींग केल्यानंतर दोन महिने या कोटींगचा प्रभाव राहणार आहे. एखाद्या प्रवाशाला कोरोना असला आणि त्याने एसटीच्या आतील कोणत्याही भागाला हात लावल्यास कोरोनाचा विषाणु नष्ट होईल. त्यामुळे प्रवाशांना आता एसटी बसने प्रवास करताना मनात भिती ठेवण्याची गरज उरलेली नाही.

मास्कचे पालन आवश्यक

एसटी महामंडळाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवाशांना बाधा होऊ नये यासाठी एसटी बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटींग केले आहे. परंतु तरीसुद्धा अनेक प्रवासी कोरोनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करत आहेत. काही प्रवासी विना मास्क प्रवास करताना दिसतात. त्यामुळे अशा प्रवाशांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. एखादा प्रवासी कोरोनाबाधीत असला आणि त्याचा हात जरी एसटीच्या कोणत्याही भागास लागला तरी कोरोनाचे विषाणु नष्ट होतील. परंतु त्याच्या श्वासावाटे विषाणु दुसऱ्या प्रवाशाच्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने मास्क घालणे गरजेचे आहे.

प्रवाशांना ताकीद द्यावी

ह्यएसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटींग केले ही अतिशय चांगली बाब आहे. परंतु अनेक प्रवासी मास्क वापरत नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा प्रवाशांना ताकीद देण्याची गरज आहे.

-सुनिल नारनवरे, प्रवासी


मास्क नाही तर प्रवास बंदी करा

ह्यअनेकजण निष्काळजीपणा करून मास्क घालत नाहीत. अशा प्रवाशांना एसटी बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. त्यांच्या मुळे इतरांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो.

-रणधीर कांबळे, प्रवासी

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोटींग

ह्यकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने एसटीच्या बसेसला अँटी मायक्रो बिअल कोटींग करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ९ हजार बसेसला ही कोटींग करण्यात येणार आहे. नागपूर विभागात ४३४ पैकी २९६ बसेसला ही कोटींग करण्यात आली आहे. आगामी काही दिवसातच उर्वरीत बसेसला ही कोटींग करण्यात येणार आहे.

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

Web Title: 296 ST buses became Corona Fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.