विदर्भात २९६१ पॉझिटिव्ह, ६५ मृत्यू; सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:05 PM2020-09-03T21:05:21+5:302020-09-03T21:07:23+5:30
गुरुवारी एकाच दिवशी २९६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुप्पट रुग्णसंख्या जाण्याचे चिन्ह दिसून येऊ लागले आहेत. गुरुवारी एकाच दिवशी २९६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ६३१९६ झाली असून मृतांची संख्या १७८२ वर पोहचली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपुरसह चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ व गोंदिया जिल्ह्यात आढळून आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत १७२७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४५ रुग्णांच्या मृत्यू झाले. रुग्णसंख्या ३४४३२वर गेली असून मृतांची संख्या ११७७झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. २२२ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३१६७ झाली आहे. तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३८वर गेली आहे.
गोंदिया जिल्ह्यातही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. १८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोन रुग्णांचे बळी गेले आहेत. रुग्णसंख्या १८७४ तर मृत्यूची संख्या २६ झाली आहे. बुलढाण्यात १८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ३५१४ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात रोजची रुग्णसंख्या शंभरावर जात असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. १२४ रुग्ण पॉझिटिव्ह तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १८७४तर मृतांची संख्य १०२वर गेली आहे.
भंडारा जिल्ह्यात १६७ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या १६०७ तर मृत्यूची संख्या २८ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ८८ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णांची संख्या ६२०२ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ८९ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२९४ झाली असून २९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात ७६ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या १९३८वर गेली आहे.
अकोला जिल्ह्यातही ७६रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ४२२७ झाली असून एका रुग्णाच्या मृत्यूने बळींची संख्या १६०वर पोहचली आहे. सर्वात कमी रुग्णांची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली. १८ रुग्ण पॉझटिव्ह आले. येथील रुग्णसंख्या १२१४झाली आहे.