करंजच्या ३ किलो बियांपासून १ किलो बायो डिझेल आणि २ किलो ढेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:01+5:302020-12-29T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : करंज या झाडांच्या बियांपासून तंत्रज्ञानाचा वापर करून बायोडिझेल निर्मिती होऊ शकते हे सिध्द झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : करंज या झाडांच्या बियांपासून तंत्रज्ञानाचा वापर करून बायोडिझेल निर्मिती होऊ शकते हे सिध्द झाले आहे. करंजच्या ३ किलो बियांपासून १ लिटर बायो डिझेल आणि २ किलो ढेप प्राप्त होते. या ढेपीवर अधिक संशोधन करून शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक कसे तयार करता येईल यावर संशोधन व्हावे, अशी अपेक्षा महामार्ग रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ग्रीक क्रूड अॅण्ड बायो फ़्यूएल फाऊंडेशनतर्फे करंजच्या झाडाच्या रोपट्यांचे वितरण करताना ते बाेलत होते. व्यासपीठावर डॉ. हेमंत जांभेकर, डॉ. राजेश मुरकुटे, अजित पारसे उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्तीने करंजची ५ झाडे लावावी. ३ वर्षे या झाडांना जगवल्यानंतर चौथ्या वर्षापासून त्याला फळे येण्यास सुरुवात होते. ३० किलो बियाणे जरी या फळातून दरवर्षी निघाले तर वर्षाला २५ ते ३० हजार रुपये मिळतील. शेतकरी आपल्या शेतीच्या धुऱ्यावर ही झाडे लावू शकतात. गरीब माणूस, शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहाचावे, असेही ते म्हणाले.