नागपुरात मेयोतील ३०वर डॉक्टरांना डेंग्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 08:45 PM2018-10-20T20:45:14+5:302018-10-20T20:49:48+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, याच रुग्णालयातील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या दोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, याच रुग्णालयातील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या दोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
मेयोच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात सोयी कमी गैरसोयीच जास्त आहेत. येथील डॉक्टरांच्या मते, वसतिगृहातील ड्रनेज लाईन नेहमीच तुंबते. यातच वसतिगृहाच्या आजूबाजूला पाणी साचून राहत असल्याने वसतिगृह डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचीही अशीच स्थिती आहे.
डॉक्टरांनी सचिवांकडे केली तक्रार
वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी शनिवारी मेयो रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी निवासी डॉक्टरांनी डॉ. मुखर्जी यांच्यासमोर वसतिगृहातील समस्यांचा पाढाच वाचला.