३० तासांचे शटडाऊन

By admin | Published: January 12, 2015 01:06 AM2015-01-12T01:06:50+5:302015-01-12T01:06:50+5:30

एकीकडे थंडीच्या कडाक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच गळती दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने त्याचा शहरातील निम्म्या भागातील वस्त्यांना त्याचा फटका बसणार आहे.

30 hour shutdown | ३० तासांचे शटडाऊन

३० तासांचे शटडाऊन

Next

आजपासून अनेक वस्त्यांना पाणी नाही
नागपूर: एकीकडे थंडीच्या कडाक्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच गळती दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने त्याचा शहरातील निम्म्या भागातील वस्त्यांना त्याचा फटका बसणार आहे.
‘शटडाऊन’ ३० तासांचे आहे. त्यामळे सोमवारी १२ जानेवारीला सकाळी पाणीपुरवठा होईल. त्यानंतर १४ जानेवारीलाच पाणी मिळेल. ‘शटडाऊन’च्या दरम्यान मंगळवारी, आशीनगर, सतरंजीपुरा,लकडगंज, नेहरूनगर आणि धंतोली झोनमधील वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. या भागात टॅन्करसुध्दा पाठविले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना सोमवारीच आवश्यक तेवढ्या पाण्याचा संग्रह करून ठेवावा लागणार आहे.
‘शटडाऊन’च्या काळात कन्हान जलशुद्धीकरण केद्रात १३०० मि.मी. व्यासाच्या व्हॉल्वची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याच प्रमाणे कन्हानच्याच ९०० मिमी व्यासाच्या वाहिनीवर व्हॉल्व लावण्यात येणार आहे. कुंदनलाल गुप्ता नगरजवळ तसेच शांतिनगर फीडरवरील गळती दुरुस्ती केली जाणार आहे. बस्तरवारी फीडरवर फ्लो मीटर लावणे, नारी व जरीपटका परिसरात आंतरजोडणीचे काम आणि नारी जलकुंभावर आंतर जोडणीचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे गत १५ दिवसात शहराच्या विविध भागातील गळती दुरुस्ती आणि इतरही कामासाठी अनेक वेळा ‘शटडाऊन’ करण्यात आले.
पण त्याने समस्या सुटली नाही. आता पुन्हा एकदा दोन दिवसासाठी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
या वस्त्यांना पुरवठा नाही
मंगळारी झोन -नवी वस्ती, कडबी चौक, क्लार्क टाऊन
आशीनगर झोन- बेझनबाग जलकुंभ परिसररातील वस्त्या, इंदोऱ्यातील दोन्ही जलकुभ परिसरातील वस्त्या, नारी, बिनाकी
सतरंजीपुरा झोन-शांतिनगर,बस्तरवारीमधील जलकुंभा जवळील वस्त्या,दहा नंबर पुल, इंदोरा
लकडगंज झोन-कळमना,लकडगंज,देशपांडे ले-आऊट, मिनीनाता नगर, सुभाषनगर जलकुभांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्या
नेहरूनगर झोन- सक्करदरा,नंदनवन,दिघोरी,खरबी येथील जलकुंभावरून पाणी पुरवठा होणाऱ्या वस्त्या.
धंतोली झोन- अक्षय भवन,भांडे प्लॉट परिसर

Web Title: 30 hour shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.