नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये ३० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:42+5:302021-01-14T04:07:42+5:30
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी विशाखापट्टनम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये ३ लाख ३ हजार ८८० रुपये किमतीचा ३०.३८८ किलो गांजा ...
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी विशाखापट्टनम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये ३ लाख ३ हजार ८८० रुपये किमतीचा ३०.३८८ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी तीन आराेपींना अटक केली.
दीपक कुमार पासवान (१९), विक्की कुमार पासवान (१९) रा. सोनीपत, हरियाना, गगन कुमार जाटव (३१) रा. गाजियाबाद उत्तर प्रदेश अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टनम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ पथक गस्तीवर असताना बी ७ कोचमध्ये बर्थ क्रमांक ३९, ४० वरून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यांच्या बॅगमधून गांजासारखा वास येत होता. याची सूचना नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नागपूर रेल्वेस्थानकावर त्यांना गाडीखाली उतरवून त्यांच्या बॅगची झडती घेतली. दरम्यान, त्यात ३ लाख ३ हजार ८८० रुपये किमतीचा ३०.३८८ किलो गांजा आढळला. त्यामुळे ताे जप्त करून आराेपींना अटक केली. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.