३० कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:00 AM2020-05-11T07:00:00+5:302020-05-11T07:00:07+5:30

सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली.

30 prisoners released from Nagpur Central Jail | ३० कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

३० कैदी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा धोका असल्याने सध्या आॅटो, बसेस उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिक कैद्यांना शहर पोलीस आणि बाहेरच्या कैद्यांना ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्यांच्या गावात नेऊन सोडणार असल्याचेही अधीक्षक कुमरे यांनी स्पष्ट केले.

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात वर्षांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य शासनाने शनिवारी सायंकाळी राज्य कारागृह प्रशासनाला दिलेल्या निर्देशांनुसार ठिकठिकाणच्या हजारो बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू केली. या पार्श्वभूमीवर नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या आणि चांगले वर्तन असलेल्या ३० कैद्यांना क्रमश: जामिनावर सोडण्याची प्रक्रिया रविवारी रात्रीपर्यंत सुरू होती.
कोरोना कारागृहात शिरू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठिकठिकाणी कमिट्या तयार झाल्या. सात वर्षापर्यंतची शिक्षा ज्या गुन्ह्यात आहे, अशा गुन्ह्यातील न्यायाधीन बंदिवानांना कारागृहातून जामिनावर सोडण्याचा निर्णय या समितीने घ्यावयाचा होता. त्यानुसार, राज्यातील हजारो कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. दुसऱ्या निर्णयानुसार ज्या कैद्यांना सात वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्यात आली आणि ज्यांचे वर्तन चांगले आहे, ते सुधारण्याच्या मार्गावर आहे, अशा कैद्यांनाही कारागृहातून जामिनावर सोडण्यासाठी निर्णय घेण्याचे आदेश होते. त्यानुसार प्रत्येक कारागृह प्रशासनाकडून चांगल्या वर्तन असलेल्या कैद्यांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने तो रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांच्या गडबडीत राज्य सरकार आणि प्रशासन गुंतून पडले होते. त्यामुळे हा निर्णय रखडला होता. शनिवारी सायंकाळी या संबंधाने राज्य सरकारने कारागृह प्रशासनाला संबंधित कैद्यांना सोडण्याविषयीचे आदेश जारी केले. त्यानुसार, रविवारी दुपारपासून वेगवेगळ्या कारागृहात कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

९ महिलांसह २५९ कैद्यांना लाभ
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांपैकी २५९ कैद्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यात नऊ महिला कैद्यांचाही समावेश आहे. कारागृहात राहून ज्यांनी आपले वर्तन चांगले ठेवले, वेळोवेळी नियमांचे पालन केले, तसेच फरलो आणि पॅरोलवर गेल्यानंतर नियोजित तारखेला बिनचूकपणे जे कैदी कारागृहात परत आले, अशांनाच या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी ‘लोकमत'ला दिली.


 

 

Web Title: 30 prisoners released from Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग