नागपुरात ३० हजार ग्राहकांची वीज गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 10:33 PM2018-11-30T22:33:09+5:302018-11-30T22:34:54+5:30
मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजीला केबल बदलवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजीला केबल बदलवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
पहाटे ५.३० वाजता लाईन ट्रीप झाल्याने उप्पलवाडी सब स्टेशनचे आॅपरेटरला केबल क्षतिग्रस्त झाल्याचा संशय आला. पेट्रोलिंगसाठी गेलेल्या टीमला आॅटोमोटिव्ह चौकातील केबल क्षतिग्रस्त झाल्याचे आढळून आले. यामुळे ११ केव्ही क्षमतेच्या एकता कॉलनी फिडर, लष्करीबाग, सुजाता नगर, टेका, बिनाकी फिडरवरील वीजपुरवठा ठप्प झला. तब्बल ३० हजार वीज गाहक प्रभावित झाले. एसएनडीएलचे म्हणणे आहे की, मेट्रो रेल्वेने क्षतिग्रस्त केबल स्वत: बदलवून देण्याची मागणी मान्य केली आहे. केबल बदलण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.
प्रभावित वस्त्या
केबल प्रभावित झाल्याने उत्तर नागपुरातील मोठा परिसरात प्रभावित झाला. यात महेंद्रनगर, मो. रफी चौक, बंदे नवाजनगर, यादवनगर, वैशालीनगर, पंचशीलनगर, खंतेनगर, फारुक नगर, टेका, संजय गांधीनगर, इंदिरा मातानगर आदींचा समावेश आहे. सकाळी ७.३० वाजेपर्यंत इतर फिडरशी जोडून वीज पूरवठा सुरळीत करण्यात आल्याचेही एसएनडीेलचे म्हणणे आहे.