नागपुरात ३० रेल्वे गाड्यांना झाला उशीर; उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:20 PM2018-01-03T12:20:33+5:302018-01-03T12:20:59+5:30
उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिणकडून येणाऱ्या आणि उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे अनेक तास उशिरा धावत आहेत.
Next
ठळक मुद्देतीन गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल
आॅनलाईन लोकमत
नागपूर : उत्तर भारतातील धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिणकडून येणाऱ्या आणि उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे अनेक तास उशिरा धावत आहेत.
मंगळवारी ३० रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर उशिरा आल्या आणि रवाना झाल्या. तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या. यामध्ये ५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर, ५१८३० इटारसी-नागपूर पॅसेंजर आणि २२८८५ लोकमान्य तिळक टर्मिनस-टाटानगर रेल्वेचा समावेश आहे.