३०० अतिक्रमणाचा सफाया, ५ ट्रक साहित्य जप्त()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:55+5:302021-03-05T04:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी शहरातील ३०० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी शहरातील ३०० अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. यादरम्यान पथकाने ५ ट्रक साहित्य जप्त करून १६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल के ला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमण हटाव कारवाई होत आहे. गुरुवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत आयटी पार्क चौक ते हिंगणा चौक दरम्यान ४२ अतिक्रमण हटविण्यात आले. विक्रेते, ठेलेवाल्यांचे एक ट्रक साहित्य जप्त करून २ हजार दंड वसूल केला.
धरमपेठ झोनच्या पथकाने गोकुळपेठ बाजार ते बर्डी ते मोदी नं. २ येथील दुकानांचे शेड तोडण्यात आले. तसेच फूटपाथवरील ३६ अतिक्रमण हटवून परिसर मोकळा करण्यात आला.३५०० रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने म्हाळगीनगर ते पिपळा फाटा ते परते म्हाळगीनगर चौक ३४ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त केले.
धंतोली झोनक्षेत्रात शुक्रवारी तलाव ते गणेशपेठ परिसरातील ५२ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. एक टन साहित्य जप्त करण्यात आले.
गांधीबाग झोन भागातील सेंट्रल एव्हेन्यू रोड ते बडकस चौक दरम्यानच्या मार्गावरील १२ अतिक्रमण हटविले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सतरंजीपुरा झोनअंतर्गत मारवाडी चौक, भारतमाता चौक, गोळीबार चौकातील ४८ अतिक्रमण हटविण्यात आले. मंगळवारी झोन परिसरातील सर्व अतिक्रमण हटविण्यात आले. आशीनगर झोन भागातील ४२ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला.