३०० नवे रुग्ण, ५३४ बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:25 AM2020-12-14T04:25:48+5:302020-12-14T04:25:48+5:30
नागपूर : मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहत होती. परंतु रविवारी चित्र बदलले. ...
नागपूर : मागील काही दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी राहत होती. परंतु रविवारी चित्र बदलले. ३०० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५३४ रुग्ण बरे झाले. परिणामी, रिकव्हरी दरात काहीशी वाढ होऊन ९१.८३ टक्क्यांवर गेली. आज पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३,७९७ झाली असून, रुग्णसंख्या १,१७,२११ वर पोहचली.
नागपूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या ४०० ते ५०० दरम्यान दिसून येत होती. परंतु, रविवारी चाचण्यांची संख्या पाच हजाराखाली गेली. यामुळे की काय दैनंदिन रुग्णांमध्ये वाढही कमी झाली. ४,८९६ चाचण्यांमध्ये ४,३०९ आरटीपीसीआर तर ५८७ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. यातून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २६१, ग्रामीण भागातील ३९ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील चार तर ग्रामीण भागातील एक आहे. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या १,०७,६३२ रुग्णांमध्ये शहरातील ८५,२३८ तर ग्रामीण भागातील २२,३९४ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ५,७८२ रुग्ण उपचाराखाली असून, यातील ४,३५४ रुग्ण होम आयसाेलेशनमध्ये आहेत.
-मेडिकलमधून ५,६६२ रुग्ण बरे
कोरोनाच्या या नऊ महिन्याच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) ५,६६२ रुग्ण बरे झाले आहेत, तर १४८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या २१५ रुग्ण उपचार घेत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) १८८६ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. १२९२ रुग्णांचा मृत्यू झाला. ८३ रुग्ण उपचाराखाली आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ७३१ रुग्णांना बरे केले. २१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३५ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-
-दैनिक संशयित : ४,८९६
-बाधित रुग्ण : १,१७,२११
_-बरे झालेले : १,०७,६३२
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,७८२
- मृत्यू : ३,७९७