३१ तहसीलदारांच्या बदल्या
By admin | Published: May 4, 2017 02:16 AM2017-05-04T02:16:42+5:302017-05-04T02:16:42+5:30
नागपूर विभागातील ३१ तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नागपूर : नागपूर विभागातील ३१ तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कामठीचे तहसीलदार सचिन गोसावी यांची विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे तहसीलदार (पुनर्वसन) म्हणून बदली करण्यात आली आहे. रामटेकचे तहसीलदार रवींद्रकुमार माने यांची विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल), नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील (नझूल) विनिता लांजेवार यांची कुही, वर्धा जिल्हा कार्यालयातील अधीक्षक प्रमोद कदम यांची चिमूर, कारंजाचे एस.जे. मडावी यांची वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक, विभागीय आयुक्त कार्यालयातील (जमीन) अक्षय पोयाम यांची पारशिवनी, चंद्रपूरचे ए.एस. वानखेडे यांची गडचिरोली, चिमूरचे एस.आर. महले यांची लाखांदूर, आरमोरीचे मणिराम वलथरे यांची (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे, पारशिवनीचे तहसीलदार बाबासाहेब टेळे यांची कामठी, नारायण ठाकरे यांची गडचिरोली (सामान्य), लीना फलके यांची (नझूल) जिल्हाधिकारी कार्यालय), सेलूचे रवींद्र होळी यांची राजूरा, पवनीचे एस.के. वासनिक यांची अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, मोहाडीचे धनंजय देशमुख यांची सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा, साकोलीचे ए.डब्ल्यू. खडतकर यांची नागपूर, लाखांदूरचे यु.एस. तोडसाम यांची वर्धा सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडाराचे सहाय जिल्हा पुरवठा अधिकारी एस.वाय रामटेके यांची तिरोडा, तिरोड्याचे रवींद्र चव्हाण यांची गोंदिया, देवरीचे संजय नागटिळक यांची कोरची, गोंदियाचे अरविंद हिंगे यांची साकोली, राजुराचे डी. एस. फुसाटे यांची रामटेक, जीवती येथील एस.डी. पाटील यांची मोहाडी, चंद्रपूरचे खरेदी अधिकारी जी.एस. कोड्डे यांची पवनी, कोरचीचे विजय बोरुडे यांची देवरी, गडचिरोलीचे संतोष खांडरे यांची चंद्रपूर, गडचिरोलीचे महेंद्र सोनोने यांची सेलू, विभागीय आयुक्त कार्यालयातील महेश शितोळे यांची करंजा, कुहीचे मलिक विराणी यांची जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथील निवडणूक विभाग, सिरोंचाचे अतिरिक्त तहसीलदार यांची आयुक्त कार्यालय येथे सहा. विभागीय पुरवठा अधिकारी आणि गडचिरोलीचे यशवंत धाईत यांची आरमोरी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)