सहा महिन्यांत देशभरात ३१० बिबट्यांचा बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक ९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:36 AM2021-07-05T10:36:07+5:302021-07-05T10:36:28+5:30

Nagpur News leopards भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटीच्या (डब्ल्यूपीएसआय) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, यावर्षी गेल्या फक्त सहा महिन्यांंत देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत.

310 leopards killed across the country in six months | सहा महिन्यांत देशभरात ३१० बिबट्यांचा बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक ९५

सहा महिन्यांत देशभरात ३१० बिबट्यांचा बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक ९५

googlenewsNext
ठळक मुद्दे दर दाेन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्याघ्र संवर्धनाकडे जबाबदारीने लक्ष देतानाच इतर प्राण्यांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष हाेत आहे की काय, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटीच्या (डब्ल्यूपीएसआय) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, यावर्षी गेल्या फक्त सहा महिन्यांंत देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत. आणखी चिंताजनक म्हणजे यात सर्वाधिक ९५ मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत.

दाेनच वर्षांपूर्वी २०१८ मध्ये भारतीय वने व पर्यावरण मंत्रालयाने देशात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याची माहिती दिली हाेती. २०१४ मध्ये ७,९१० असलेली बिबट्यांची संख्या २०१८ मध्ये १२,८५२ वर पाेहोचली. मध्य प्रदेश व कर्नाटकनंतर १,६९० बिबट्यांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात बिबट्यांच्या मृत्यूत ५७ टक्क्यांची वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश ४१, उत्तराखंड ३८, राजस्थान २४ आणि जम्मू-काश्मीरमध्ये २० बिबट्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात १८० दिवसात ९५ म्हणजे दर दाेन दिवसांनी एका बिबट्याचा मृत्यू झाला. यामध्ये ५१ नैसर्गिक, ३६ अपघाती मृत्यू, तर दाेन बिबट्यांची शिकार झाल्याचे समजते.

महाराष्ट्रात ५ वर्षात झालेले मृत्यू

वर्ष मृत्यू             नैसर्गिक अपघाती

२०१६ ८९             ५३            २९ (७ शिकार)

२०१७ ८६             ५५            २१ (९ शिकार)

२०१८ ८८             ५४ २७

२०१९ ११०                         ३५ --

२०२० १७२             ८० ६४

 

अपघाती मृत्यू वाढले

गेल्या काही वर्षात प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बिबट्यांच्या बाबतीत २०१८ पासून हा आकडा वाढलेला दिसताे. रस्ते व रेल्वे अपघात, खुल्या विहिरीत पडणे आणि श्वानांच्या हल्ल्यात मारले जाणे अशी कारणे आहेत. २०१८ मध्ये २७, २०१९ मध्ये ३५, तर २०२० मध्ये ६४ बिबट्यांनी अपघातात जीव गमावला. याशिवाय प्राण्यांचे अधिवास नष्ट हाेणे, मानवी हस्तक्षेप व नैसर्गिक स्रोतांवर वाढलेला दबाव ही महत्त्वाची कारणे आहेत.

गेल्या सहा महिन्यात १५००० किलाेमीटरचे रस्ते रुंदीकरण झाले. जंगलातही रस्त्यांचे नेटवर्क प्रचंड वाढले आहे. त्यामुळे जंगलातील गावांचेही शहरीकरण झाले. अतिक्रमण प्रचंड वाढले आहे. जंगलाचे क्षेत्र घटल्याने प्राण्यांना जागाच उरली नाही. बिबट्यांची संख्या वाढली म्हणतात, पण तेही भ्रम निर्माण करणारे आहे.

- प्रफुल्ल भांबुरकर, वन्यजीव अभ्यासक

Web Title: 310 leopards killed across the country in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.