३१३ गावात विकास योजना

By admin | Published: February 25, 2015 02:47 AM2015-02-25T02:47:53+5:302015-02-25T02:47:53+5:30

अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी व्हावी यासाठी निवड करण्यात आलेल्या ३१३ गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यात कृषी, वन, सामाजिक वनीकरण...

313 villages development plan | ३१३ गावात विकास योजना

३१३ गावात विकास योजना

Next

अभियानाची प्रभावी अंमलबाजवणी व्हावी यासाठी निवड करण्यात आलेल्या ३१३ गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यात कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघु सिंचन व जलसंधारण , जिल्हा परिषदेचा लघु सिंचन विभाग, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा योजना व ग्रामपंचायत आदींचा समावेश आहे. या विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या गावात कोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत, याची माहिती नोडल अधिकाऱ्यांना द्यावयाची असून त्यानंतर विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
टंचाईग्रस्त गावात कायमस्वरूपी उपाययोजना होणे अपक्षित आहे. यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यात जिल्हा पषिद अध्यक्ष, जिल्ह्यातील आमदार व खासदार, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प., जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व जिल्हा पातपळीवरील अधिकाऱ्यांचा या समावेश आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 313 villages development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.