३१६५ नवीन तलाठी साझाची निर्मिती

By admin | Published: May 18, 2017 02:39 AM2017-05-18T02:39:01+5:302017-05-18T02:39:01+5:30

तलाठी साझा व महसूल मंडळ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील सर्व शिफारशी मान्य करून

3165 new talotty share production | ३१६५ नवीन तलाठी साझाची निर्मिती

३१६५ नवीन तलाठी साझाची निर्मिती

Next

पुनर्रचना समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य : ५२८ नवी मंडळ कार्यालये होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तलाठी साझा व महसूल मंडळ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील सर्व शिफारशी मान्य करून राज्यात ३ हजार १६५ नवीन तलाठी साझा तसेच ५२८ नव्या मंडळ कार्यालयाच्या निर्मितीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली.
राज्यातील भौगोलिक, प्रादेशिक विविधता व इतर अनुषंगिक बाबीच्या आधारे तलाठी साझा पुनर्रचना विषय समितीने महानगरपालिका क्षेत्र, महानगरपालिका क्षेत्राचे १० कि.मी. पर्यंतचे क्षेत्र (झालर क्षेत्र), अ व ब नगरपालिका, अ व ब नगरपालिका क्षेत्राच्या ५ कि.मी. पर्यंतचे क्षेत्र, क वर्ग नगरपालिका, गिरीस्थान नगरपालिका व नगर पंचायती, ग्रामीण भाग, आदिवासी भाग, माडा, मिनीपाडा, टीएसपी तसेच तटीय क्षेत्राला महत्त्वाचे नवीन क्षेत्र म्हणून विचारात घेण्यात आले आहे. या निर्णयामुळे करवसुलीशिवाय भूमिअभिलेख विषयक बाबी, दुष्काळ-नैसर्गिक आपत्तीत मदत कार्य, जनगणना, निवडणुका, विशेष साहाय्य योजना, विविध दाखल्यांचे वाटप, आदी कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका, अ व ब नगर परिषदा तसेच त्याचे परिघीय क्षेत्र आणि क वर्ग नगर परिषदा यांचा विचार करून या नागरी भागातील ४१५ व आदिवासी क्षेत्रातील ३५१ अशा एकूण ७६६ नवीन तलाठी साझे व १२८ महसूल मंडळांची निर्मिती २०१७-१८ या वर्षामध्ये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात २०१८-१९ मध्ये अ व ब वर्ग गावांसाठी ८०० साझे व १३३ महसूल मंडळे निर्माण करण्यात येतील, तर २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात अनुक्रमे ८०० व ७९३ तलाठी साझे आणि १३३ व १३४ महसूल मंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे.

Web Title: 3165 new talotty share production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.