नागपूर जिल्ह्यातील ३१.६६ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:21 AM2019-07-06T10:21:43+5:302019-07-06T10:23:21+5:30

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.

31.66 percent sowing has been done in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील ३१.६६ टक्के पेरण्या आटोपल्या

नागपूर जिल्ह्यातील ३१.६६ टक्के पेरण्या आटोपल्या

Next
ठळक मुद्देकापसाची पेरणी सर्वाधिकधानाच्या रोवणीला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळबंल्या होत्या. जुलै महिना लागताच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पण अद्यापही पाऊस सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पडला असला तरी, जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, आठवडाभरात ३१.६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने सादर केली आहे.
जिल्ह्यात खरिपाचे नियोजन ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर करण्यात आले आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख २५ हजार हेक्टर आहे. तर सोयाबिनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. मागीलवर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकºयांनी यंदा सावध भूमिका घेतली.
पावसाचा अंदाज घेऊनच शेतकºयांनी पेरण्या केल्याने दुबार पेरणीची शक्यता कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ४ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २२४.९१ मि.मी. मीटर पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ४ जुलैपर्यंत केवळ २००.२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तो सरासरीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे.

पीकनिहाय पेरण्या
आजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ३१.६६ टक्के म्हणजेच १ लाख ५१ हजार ५६७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कापसाची १ लाख ९ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सोयाबीन २३ हजार ६५३ हेक्टर, भुईमूग ५७ हेक्टरवर, तूर १७ हजार ८६४ हेक्टर, मूग २६ हेक्टर, उडीद ३० हेक्टर, ज्वारी १७६ हेक्टर आणि मक्याची पेरणी ३१४ हेक्टरवर झाली आहे. पाऊस सातत्याने बरसल्यास उर्वरित पेरण्या येत्या काही दिवसांत पूर्ण होतील, असा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे

धानाची रोवणी पंधरवड्यानंतर
जिल्ह्यात यंदा धानाचे ९४ हजार २०० हेक्टर एवढे नियोजित क्षेत्र आहे. जिल्ह्यातील मौदा, रामटेक, पारशिवनी, कामठी, कुही, उमरेड व भिवापूर या तालुक्यांमध्ये भाताची रोवणी केली जाते. मात्र, सध्या धानाची रोवणी करण्यायोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी शेतात पºहे टाकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे भात रोवणी ही पुढील पंधरवड्यानंतरच जिल्ह्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 31.66 percent sowing has been done in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती