विदर्भात २४ तासात ३,२७६ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:47+5:302021-03-10T04:09:47+5:30
-२० मृत्यूची नोंद : नागपूर जिल्ह्यात १,३३८, बुलडाण्यात ५७९, यवतमाळमध्ये ३१८ रुग्णांची भर नागपूर : विदर्भात गेल्या २४ तासात ...
-२० मृत्यूची नोंद : नागपूर जिल्ह्यात १,३३८, बुलडाण्यात ५७९, यवतमाळमध्ये ३१८ रुग्णांची भर
नागपूर : विदर्भात गेल्या २४ तासात ३,२७६ नव्या रुग्णांची भर पडली तर २० रुग्णांचे जीव गेले. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. रुग्णांची एकूण संख्या ३,४९,१६० झाली असून मृतांची संख्या ७,६१३ वर गेली आहे. सर्वाधिक रुग्णांची नोंद आज नागपूर जिल्ह्यात झाली. १,३३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ६ मृत्यू झाले. बुलडाणा जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. अमरावती जिल्ह्याला मागे टाकत ५७९ नवे रुग्ण नोंदविल्या गेले तर, २ रुग्णांचे जीव गेले. याशिवाय, यवतमाळ जिल्ह्यात ३१८ रुग्ण व २ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात २८२ रुग्ण व ३ मृत्यू, अकोल्यात २६७ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात २१४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अमरावती जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा रुग्ण एकूण रुग्ण मृत्यू
नागपूर १३३८ १६०३४३ ०६
वर्धा २१४ १३७८६ ०२
गडचिरोली २७ ९७२६ ००
गोंदिया १२ १४५८२ ०१
भंडारा ४५ १४०२० ००
चंद्रपूर ८२ २४३२२ ०१
यवतमाळ ३१८ १९७४३ ०२
अमरावती २८२ ४०२६८ ०३
वाशिम ११२ १०४७० ००
अकोला २६७ १९५०० ०३
बुलडाणा ५७९ २२४०० ०२