३४० अंगणवाडी सेविकांनी परत केले मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:10 AM2021-09-15T04:10:34+5:302021-09-15T04:10:34+5:30
नागपूर : अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे देण्यात आलेले मोबाईल कुठल्याही उपयोगाचे नसल्याने अंगणवाडी सेविकांचे मोबाईल परत करण्यासंदर्भातील आंदोलन सुरू आहे. ...
नागपूर : अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे देण्यात आलेले मोबाईल कुठल्याही उपयोगाचे नसल्याने अंगणवाडी सेविकांचे मोबाईल परत करण्यासंदर्भातील आंदोलन सुरू आहे. मंगळवारी मौदा व कुही तालुक्यातील ३४० अंगणवाडी सेविकांनी स्थानिक प्रकल्प अधिकाऱ्यांना मोबाईल परत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे सरचिटणीस श्याम काळे, रेखा कोहाड, मंगला रंगारी, ज्योती अंडरसहारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मोबाईलचा रॅम्प कमी असल्यामुळे मोबाईल हँग होतो, गरम होतो, मोबाईल बिघडल्यामुळे त्यांना स्वतःच्या खर्चातून मोबाईल दुरुस्त करावा लागतो, अशा अनेक अडचणी तसेच मोबाईलमधील पोषण टॅकर ॲप जोपर्यंत मराठीत होणार नाही तोपर्यंत कोणत्याही सेविका मोबाईलला हात लावणार नाही, असा निर्धार करीत शासनाकडे नवीन मोबाईलची मागणी यावेळी करण्यात आली.