३४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:10+5:302021-01-18T04:09:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : पाेलिसांनी मांढळ (ता. कुही) शिवारात केेलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा टिपर पकडला. त्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पाेलिसांनी मांढळ (ता. कुही) शिवारात केेलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा टिपर पकडला. त्यात चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून टिपर व रेती असा एकूण ३४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. कुही पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मांढळ परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली. संशय आल्याने त्यांनी मांढळच्या दिशेने जात असलेला एमएच-४०/बीएल-२४८६ क्रमांकाचा टिपर थांबवून झडती घेतली. त्यामध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची कसून तपासणी केली. त्यात टिपरमधील रेती विनाराॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी टिपरचालक सचिन घनश्याम दुबे यास ताब्यात घेत अटक केली.
त्याच्याकडून ३४ लाख रुपये किमतीचा टिपर आणि ३० हजार रुपये किमतीची पाच ब्रास रेती असा एकूण ३४ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली. या प्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक अनिल देरकर करीत आहेत.