विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 08:43 PM2019-12-21T20:43:03+5:302019-12-21T20:44:05+5:30

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशक सहा दिवस चालले. परंतु विधान परिषदेत कामकाज झाले. अधिवेशन काळात एकूण ३४ तास ३९ मिनिटे कामकाज झाले.

3.46 hours of work wasted in six days in the Legislative Council | विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले

विधान परिषदेत सहा दिवसात कामकाजाचे ३.४६ तास वाया गेले

Next
ठळक मुद्दे३४ तास ३९ मिनिटे कामकाज : ५०९ लक्षवेधी सूचना आल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशक सहा दिवस चालले. परंतु विधान परिषदेत कामकाज झाले. अधिवेशन काळात एकूण ३४ तास ३९ मिनिटे कामकाज झाले. मंत्री उपस्थित नसल्याने फ क्त २० मिनिटे काम झाले नाही, तर गोंधळामुळे ३.२६ तास कामकाज बाधित झाले. दररोज सरासरी ५तास ५० मिनिटे कामकाज झाले.
विधान परिषदेच्या शेवटच्या दिवशी सभापती रामराजे निंबाळकर यांनी अधिवेशन काळातील कामकाजाची सभागृहात माहिती दिली. यात नियम ९३ अन्वये २७ सूचना प्राप्त झाल्या. यातील १५ स्वीकृत करण्यात आल्या. सभागृहात सात सूचनावर निवेदन करण्यात आले तर तीन सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या.
औचित्याच्या ५९ मुद्यापैकी ४५ सभागृहात उपस्थित करण्यात आले. लक्षवेधी सूचना ५०९ आल्या. यातील १३९ मान्य करण्यात आल्या. तर ३० सूचनावर चर्चा झाली. विशेष उल्लेखाच्या ११३ सूचना प्राप्त झाल्या, तर ७८ सूचना मांडण्यात आल्या. नियम ९३ अन्वये दोन सूचना प्राप्त झाल्या. अल्पकालीन चर्चेच्या २ सूचना आल्या यातील एकावर चर्चा करण्यात आली. नियम ४३ अन्वये मंत्र्यांनी तीन निवेदने केली. सात शासकीय विधेयके पारित करण्यात आली. नियम २८९ अन्वये १३ प्रस्ताव आले. नियम २६० अन्वये दोन सूचना आल्या. एकावर चर्चा झाली. तसेच अंतिम आठवडा प्रस्तावर चर्चा झाल्याची माहिती सभापतींनी दिली.

Web Title: 3.46 hours of work wasted in six days in the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.