राज्यभरातील वन विभागात ३,४७९ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:18+5:302021-07-16T04:07:18+5:30
नागपूर : राज्यातील वन विभाग रिक्त पदांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे. पाचही संवर्ग मिळून असलेल्या २०,०९७ पदांपैकी १६,३८४ ...
नागपूर : राज्यातील वन विभाग रिक्त पदांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे. पाचही संवर्ग मिळून असलेल्या २०,०९७ पदांपैकी १६,३८४ पदे भरलेली असून ३,४९७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे येत्या तीन महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढणार आहे.
राज्याच्या वन विभागामध्ये एकूण १०७ कॅडर आहेत. मात्र यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांपर्यंतची अनेक पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. दरवर्षी रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत असूनही नवीन पदे भरण्यात न आल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे वन विभागाचे कामकाज मंदावल्याची स्थिती आहे.
...
प्रशासकीय कामकाज ठप्प
राज्यातील रिक्त पदांममुळे वन विभागाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडल्यासारखी स्थिती आहे. प्रशासकीय अधिकारी हे पद महत्वाचे असते. या २० पैकी फक्त १२ पदे भरलेली आहेत. कार्यालयीन अधिक्षकांची ७३ पैकी ३० पदे रिक्त आहेत. मुख्य लेखापालाची ३५ तर लेखापालाची १५० पदे रिक्त असल्याने कामकाजातील विलंब आणि ताण वाढला आहे. या सोबतच लिपिकाची ३२१ आणि सर्व्हेअरची ७५ पदेही रिक्त आहेत.
...
अशी आहे स्थिती
संवर्ग - एकूण - भरलेली - रिक्त
संवर्ग अ - ६४७ -४०१ - २४६
संवर्ग ब - १,११८ - ८८८ - २३०
संवर्ग ब (अराजत्रित) - १४७ - ९३ - ६३
संवर्ग क - १६,६५६ - १४,०६७ - २,५८९
संवर्ग ड - १,५२९ - ८९८ - ६३१
एकूण - २०,०९७ - १६,३४८ - ३,७४९
...
कोट
रिक्त पदे न भरण्यासोबतच पदोन्नतीची प्रकरणे अडवून धरण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने आजारपणाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. पदभरती लवकर न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.
- किशोर पोहणकर, राज्याध्यक्ष, वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन वन कर्मचारी संघटना.
...