नागपूर शहरातील ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यालायक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:16 PM2018-08-18T23:16:46+5:302018-08-18T23:17:55+5:30
आपली बस सेवामध्ये सामील शहरातील ३० ते ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यासारख्या नाहीत. या बसेस इतक्या खराब झाल्या आहेत की चालता चालता कधीही बंद पडत असतात. या बसेसमधून विषारी वायू निघत असतो. आत बसण्याच्या सीटही खराब झाल्या आहेत. ब्रेकपासून तर इंजिनपर्यंत सारेच काही खराब होण्याच्या स्थितीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपली बस सेवामध्ये सामील शहरातील ३० ते ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यासारख्या नाहीत. या बसेस इतक्या खराब झाल्या आहेत की चालता चालता कधीही बंद पडत असतात. या बसेसमधून विषारी वायू निघत असतो. आत बसण्याच्या सीटही खराब झाल्या आहेत. ब्रेकपासून तर इंजिनपर्यंत सारेच काही खराब होण्याच्या स्थितीत आहे.
बसेससंदर्भात मिळत असलेल्या तक्रारी पाहता मनपाच्या वाहतूक विभागाने सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात ही बाबही स्पष्टपणे दिसून आली की प्रत्येक डेपोमध्ये १० ते १२ बसेसची अशीच परिस्थिती आहे. त्या बसेस धावण्याच्या परिस्थितीत नाही. परंतु या सर्वेक्षणाबाबत ना अधिकारी काही बोलायला तयार आहेत ना मनपाचे पदाधिकारी.
वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मनपाला २४० स्टँडर्डस् बसेस मिळाल्या होत्या. यापैकी तीन बसेस जळाल्या होत्या. उर्वरित २३७ बसेस तीन आॅपेरटरमध्ये प्रत्येकी ७९-७९ प्रमाणे वाटप करण्यात आले. यातही १०-१० बसेस या डेपोमध्येच पडून असतात. सध्या प्रत्येक आॅपरेटर जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या ६९-६९ बसेस चालवीत आहे. यासोबतच त्यांच्या स्वत:च्याही ३५-३५ मिनी बसेस शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.
जेएनएनयूआरएमच्या २०७ बसेस आणि खासगी आॅपरेटरच्या एकूण १०५ बसेस शहर बस सेवेत सुरू आहेत.
तज्ज्ञानुसर या खराब झालेल्या बसेसमुळे आपली बस सेवेची प्रतिमाही खराब होत आहे. ‘ग्रीन बस’ बंद झाल्याने राष्ट्रीय स्तरावर नागपूर वाहतूक सेवेची चर्चा होऊ लागली आहे. यामुळेच वाहतूक विभागानेही खराब झालेल्या बसेस शोधण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी बस डेपोचे सर्वेक्षण करून बसेसची पाहणी करण्यात आली. सर्वेक्षणाशी संबंधित अधिकाºयांना कुणाशीही चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी हवेतील प्रदूषणाचा स्तर, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता, सीट, बसेसचा बाहेरचा भाग, ब्रेक, गिअर बॉक्स, इंजिनची अवस्था आदींना मानक धरण्यात आले आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेक्षण करणाºया अधिकाºयांना बसेसमधील सीटस् उखडलेल्या, छत तुटलेले, खिळे निघालेले, गिअर बॉक्सला सपोर्टसाठी विटा ठेवलेल्या, खराब दरवाजे आदी दिसून आले. बसेसची ही परिस्थिती अशी आहे की तिला सुधारल्यानंतरही ती अधिक काळ चालू शकणार नाही.
ब्रेकडाऊनचे प्रमाण ०.४० टक्के
शहर बसेसच्या ब्रेकडाऊनचा डाटा तर अजिबात चांगला नाही. दर १० हजार किमी प्रवासानंतर ब्रेकडाऊनचे प्रमाण ०.४० टक्के आहे. दुसरीकडे एसटी महामंडळांच्या बसेसमध्ये हेच प्रमाण ०.०५ टक्के इतके आहे. आकडेवारीनुसार विचार केल्यास दररोज २५ ते ३० बसेस रस्त्यांवर खराब होऊन उभी ठेवावी लागत आहे. परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले की ब्रेकडाऊनचे प्रमाण शहर बसेसमध्ये अधिक आहे. ते कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बस सेवा अधिकाधिक चांगली होण्यासाठ आवश्यक पावले उचलल्या जात आहे. आवश्यकता पडल्यास खराब झालेल्या बसेस रस्त्यांवरून बाहेर काढू.