हावडा-मुंबई मेलमधून केली ३५ अल्पवयीन मुलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 03:47 PM2019-06-27T15:47:21+5:302019-06-27T15:53:17+5:30

गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्यप्रदेशातील राजनंदगाव रेल्वेस्थानकात पोहचलेल्या हावडा- मुंबई मेलमधून ३५ अल्पवयीन मुलांची आरपीएफ व नागपूर शहर पोलिसांनी सुटका केली.

35 juvenile children released from Howrah-Mumbai Mail | हावडा-मुंबई मेलमधून केली ३५ अल्पवयीन मुलांची सुटका

हावडा-मुंबई मेलमधून केली ३५ अल्पवयीन मुलांची सुटका

Next
ठळक मुद्देमुंबईला नेत होतेआरपीएफने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्यप्रदेशातील राजनंदगाव रेल्वेस्थानकात पोहचलेल्या हावडा- मुंबई मेलमधून ३५ अल्पवयीन मुलांची आरपीएफ व नागपूर शहर पोलिसांनी सुटका केली. या मुलांना चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात आले असून त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
गुरुवारी सकाळी गाडी क्र. १२८१० हावडा-मुंबई मेलमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या गुप्त सूचनेवरून शहर पोलिस व आरपीएफने ही गाडी रेल्वेस्थानकात येताच तपासणी केली. यात एक व्यक्ती ३५ मुलांना घेऊन प्रवास करीत होता. इतक्या सगळ््या अल्पवयीन मुलांना घेऊन जात असलेले पाहून त्या गाडीतील सहप्रवाशांना संशय आला व त्यांनी तशी सूचना नागपूर पोलिसांना दिली. या सूचनेनुसार शहर पोलिसांनी आरपीएफला कळवले. ही गाडी राजनंदगाव रेल्वे स्थानकात पोहण्याआधी नागपूर पोलिस तेथे हजर झाले होते. गाडी स्थानकावर येताच बोगी क्र. एस ५ मधून ३५ मुलांसह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या मुलांची विचारपूस करताना, त्यांना मुंबईला नेत असल्याचे समजले. पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: 35 juvenile children released from Howrah-Mumbai Mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण