गाईच्या पोटातून निघाल्या ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:16 PM2019-05-10T22:16:47+5:302019-05-10T22:17:55+5:30

प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. अत्यवस्थ स्थितीत अंबाझरी परिसरात पडलेल्या एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, लोखंडाचे नटबोल्ट, नॉयलॉन मांजा, चप्पलचे तुकडे आदी काढण्यात आले. गाय सात महिन्याची गर्भवती सुद्धा होती. अतिशय कठीण ही सर्जरी होती. मनपाच्या भांडेवाडी येथील पशु निवारा केंद्रात पशुचिकित्सक डॉ. मयूर काटे यांनी गाईचे ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी ठरले. तिच्या पोटात बऱ्याच काळापासून प्लास्टिकच्या पिशव्या जमा होत्या.

35 kg of plastic bags found in the cow's stomach | गाईच्या पोटातून निघाल्या ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या

गाईच्या पोटातून निघाल्या ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाच्या पशु अधिकाऱ्यांनी केली सर्जरी : पोटातून खिळे, नटबोल्टही निघाले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. अत्यवस्थ स्थितीत अंबाझरी परिसरात पडलेल्या एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, लोखंडाचे नटबोल्ट, नॉयलॉन मांजा, चप्पलचे तुकडे आदी काढण्यात आले. गाय सात महिन्याची गर्भवती सुद्धा होती. अतिशय कठीण ही सर्जरी होती. मनपाच्या भांडेवाडी येथील पशु निवारा केंद्रात पशुचिकित्सक डॉ. मयूर काटे यांनी गाईचे ऑपरेशन केले. ऑपरेशन यशस्वी ठरले. तिच्या पोटात बऱ्याच काळापासून प्लास्टिकच्या पिशव्या जमा होत्या.
मौंदे नावाच्या व्यक्तीचीही ही गाय होती. तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता. तिने खाणे बंद केले होते. पोट सुद्धा फुगले होते. डॉ. काटे यांनी तिच्यावर उपचार केले. औषध आणि इंजेक्शन दिल्यावर काही काळ ती बरी रहायची. नंतर परत ती बिमार पडायची. अखेर गायीचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉ. काटे यांनी ऑपरेशन करायला सुरुवात केल्यानंतर आतड्यांमध्ये प्लास्टिक फसले होते. बरोबरच लोखंडी खिळे, नटबोल्ट सह अनेक वस्तू निघाल्या. पोटातील आतड्या साफ करून सर्जरी पूर्ण केली. या ऑपरेशन नंतर गाय कमजोर झाली आहे. तिला निरोगी करण्यासाठी औषध व खाद्य पदार्थ दिले जात आहे. मुक्या जनावरांचे प्लास्टिकचे होत असलेले आघात लक्षात घेता, नागरिकांनी जागरुक होणे गरजेचे आहे.
अनेक जनावर उपचाराअभावी मृत्यू पावतात
साधारणत: प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यात फेकल्या जातात. मुक्या जनावरांच्या त्या खाण्यात येतात. त्यामुळे ते आजारी पडतात. नुकताच एक वळू गोरक्षण सभेतून उपचारासाठी आला होता. त्याच्या पोटातून ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्या होत्या.
मुक्या जनावरांना मरणास सोडू नका : डॉ. काटे
डॉ. मयुर काटे यांनी सांगितले की, मनपातर्फे भांडेवाडीत पशुनिवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे मुक्या प्राण्यांवर उपचार करण्यात येतो. त्यामुळे मुक्या प्राण्यांना मरण्यास सोडू नका, त्यांना केंद्रात उपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अंबाझरी परिसरातील या गाईचे पोट फुगले होते. १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. ती बरी होत नसल्याने तिच्यावर सर्जरी करण्यात आली. वेळेतच सर्जरी झाली नसती तर तिचा मृत्यू झाला असता. त्यामुळे आजारी जनावर आढळल्यास त्याला उपचार उपलब्ध करून देणे नागरिकांचे कर्तव्य आहे.
प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करू नका !
मनपाचे मुख्य पशु चिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, गाय व वळू यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्राण्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही फेकू नका.

Web Title: 35 kg of plastic bags found in the cow's stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.