डबल डेकर पुलासाठी ३५० कोटींची गुंतवणूक

By Admin | Published: May 12, 2017 03:02 AM2017-05-12T03:02:59+5:302017-05-12T03:02:59+5:30

वर्धा रोडवर डबल डेकर पुलाचे काम सुरू झाले आहे. प्राईड हॉटेलसमोर आणि अजनी चौकातील हॉस्पिटलसमोर एकूण १० पिलरचे बांधकाम करण्यात येत आहे.

350 crore investment for double decker bridge | डबल डेकर पुलासाठी ३५० कोटींची गुंतवणूक

डबल डेकर पुलासाठी ३५० कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

पिलरचे बांधकाम सुरू : ३.१४ कि़मी. पुलासाठी १६० पिलर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवर डबल डेकर पुलाचे काम सुरू झाले आहे. प्राईड हॉटेलसमोर आणि अजनी चौकातील हॉस्पिटलसमोर एकूण १० पिलरचे बांधकाम करण्यात येत आहे. हे पिलर मेट्रो रेल्वेच्या पिलरपेक्षा वेगळे आहेत. डबल डेकर पुलाच्या उभारणीकरिता ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
जवळपास ३.१४ कि़मी. डबल डेकर पुलाच्या निर्मितीसाठी पिलरची उंची पूर्वी ५.५ मीटर आणि त्यानंतर १५ ते १८ मीटर राहील. या मार्गावर एकूण १०६ पिलर उभारण्यात येणार आहे. सोनेगांव पोलीस ठाण्याजवळून ते अजनी चौकातील हॉस्पिटलपर्यंत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलाची लांबी ३.१४ कि़मी. राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सूत्रांनी दिली.
या मार्गावर तीन मेट्रो स्टेशन सहा पदरी पुलाच्या पिलरचा व्यास अडीच ते तीन मीटर आणि चार पदरी पिलरचा व्यास दीड ते दोन मीटर निश्चित केला आहे. डबल डेकर पुलावर मेट्रो रेल्वेचे उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर आणि छत्रपतीनगर या तीन मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यात येणार आहे. पुलाची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर (महामेट्रो) सोपविण्यात आली आहे. महामेट्रोने निर्मितीचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या पुलाचे बांधकाम एक वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

‘मनीषनगर आरयूबी’चा कार्यारंभ
महामेट्रोच्या देखरेखीत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीने ९१ कोटींच्या गुंतवणुकीतून मनीषनगर ते उज्ज्वलनगरपर्यंत रेल्वे भूमिगत पुलाचे (आरयूबी) बांधकाम सुरू केले आहे. हा आरयूबी उज्ज्वलनगरहून डबल डेकर पुलाला जोडण्यात येणार आहे. पूल सहा पदरी राहणार आहे. उज्ज्वलनगर मैदानावरसुद्धा ‘जंक्शन’चे बांधकाम सुरू झाले आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगकरिता चार पदरी भूमिगत पूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी रिलायन्स फ्रेशसमोर बांधकाम सुरू झाले आहे. हा चार पदरी भूमिगत पूल उज्ज्वलनगरला जोडण्यात येणार आहे. याकरिता उज्ज्वलनगर मैदानावर सब-वे बनविण्यात येणार आहे. १०० मीटर लांब आरयूबीचे बांधकाम १८ महिन्यात पूर्ण होणार आहे.

Web Title: 350 crore investment for double decker bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.