सरसंघचालकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

By योगेश पांडे | Published: June 2, 2023 01:02 PM2023-06-02T13:02:39+5:302023-06-02T13:06:16+5:30

मोहन भागवत यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० वा राज्याभिषेक सोहळा नागपुरात साजरा

350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj celebrated in Nagpur in the presence of RSS chief Mohan Bhagwat | सरसंघचालकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

सरसंघचालकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नागपूरातील महाल भागात असलेल्या शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानवंदना दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

संघाच्या अनेक स्वयंसेवकांकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी यानिमित्ताने हिंदू साम्राज्य दिवसाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमात सरसंघचालक भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्यावर भाष्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांनी स्वयंसेवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अंगीकारण्याची सूचनादेखील केली.

Web Title: 350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj celebrated in Nagpur in the presence of RSS chief Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.