शेतपिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्याला वर्षभरानंतर ३६ कोटीचा मदत निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 09:24 PM2021-02-25T21:24:05+5:302021-02-25T21:28:35+5:30

36 crore relief fund for the loss of crops गेल्या वर्षी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेपपिकाच्या प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून वर्षभरानंतर मदत निधी देण्यात आला आहे.

36 crore relief fund to the district for the loss of crops throughout the year | शेतपिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्याला वर्षभरानंतर ३६ कोटीचा मदत निधी

शेतपिकांच्या नुकसानीसाठी जिल्ह्याला वर्षभरानंतर ३६ कोटीचा मदत निधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या वर्षी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेपपिकाच्या प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून वर्षभरानंतर मदत निधी देण्यात आला आहे.

मागील वर्षी (२०२०) फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. यात मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशावरूर नुकसानाचे पंचनामे करण्यात आले होते. यात ३२ हजार ९९४.४८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानच्या मदतीकरता ३६ कोटी ६३ लाख १९ हजार रुपयाचा मदत निधी सरकारकडून देण्यात आला आहे. यंदाही खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले. धान व कापसालाही फटका बसला. सरकारकडून वर्षभरानंतर का होईना मदत निधी मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

तालुका बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) मदत निधी (रुपयात)

नागपूर ग्रा. ३३.८०                         ४५,०७४०

कामठी             ६५३.९०             ४४,४६,५२०

मौदा             २२९५३.१५             २७,१७,१९,४००

काटोल             १२५.००                        २२,५०,०००

नरखेड             २३१.००             ३४,२९,०००

रामटेक             १७०.०५             १२,८४,०००

पारशिवनी             ५८६.००             ७९,२९,०००

सावनेर             १२५२.००             १,७९,२६,६००

उमरेड             ४२८.१८             २९,५६,४५०

भिवापूर             १७.००                         २,३४,०००

कुही             ६५४४.००             ५, ३४,३०,३००

हिंगणा             १८.४०             २,६२,९९०

Web Title: 36 crore relief fund to the district for the loss of crops throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.