महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 07:45 AM2022-11-23T07:45:00+5:302022-11-23T07:45:01+5:30

Nagpur News देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग स्थलांतरित झाले आहेत.

36 steel industries in the state shut down due to high electricity rates | महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद

महागड्या वीजदरामुळे राज्यातील ३६ स्टील उद्योग बंद

googlenewsNext
ठळक मुद्देदहा अन्य राज्यांत स्थलांतरित सहा उद्योगांची विजेच्या मागणी कपात

नागपूर : देशात सर्वाधिक विजेचे दर महाराष्ट्रात असल्याचा फटका राज्यातील स्टील उद्योगांना बसला आहे. जास्त वीज दरामुळे महाराष्ट्रातील ३६ स्टील उद्योग बंद झाले असून दहा उद्योग गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. तर सहा उद्योगांनी विजेच्या मागणीत कपात केली आहे. राज्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असून पुढील काही वर्षांत वीज दरामुळे अनेक उद्योग बंद होऊन राेजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी उद्योजकांना चिंता आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश स्टील उद्योग बंद झाल्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात तसेच ओडिशा आणि झारखंड या राज्यांनी महाराष्ट्राची स्टील बाजारपेठ काबीज केली आहे. याकडे शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, अशी उद्योजकांची मागणी आहे.

राज्यात उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत ७५ टक्के अधिक दराने वीज विक्री होते. यामुळे उत्पादन शुल्क वाढते व त्यामुळे उद्योगांना भुर्दंड बसतो. छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांत तुलनेने कमी वीज दर आहेत. हीच बाब लक्षात घेऊन स्टील उद्योग दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत.

- सरकारने आता तरी गंभीर व्हावे

उद्योगांच्या वीज मंजुरीला मर्यादेपलीकडे विलंब होतो. सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. वीज सबसिडी संदर्भात फडणवीस सरकारने २०१९ मध्ये काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी २०२४ पर्यंत करावी आणि क्रॉस सबसिडी व इतर शुल्क कमी करून स्वस्त वीज खरेदी करावी.

- आर.बी. गोयनका, उपाध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन.

 

- विजेच्या मागणीत कपात किंवा कमी करण्यासाठी अर्ज केलेल्या महाराष्ट्रातील उद्योग

१) एसएमडब्ल्यू इस्पात देवळी एमआयडीसी, जि. वर्धा ( विजेच्या मागणीत ३८ हजार केव्हीए वरून १० हजार केव्हीए पर्यंत कमी)

२) राजुरी स्टील आणि अलॉयज प्रा. लि. मूल एमआयडीसी, जि. चंद्रपूरने प्रकल्प बंद केला आहे आणि विजेची ६ हजार केव्हीए हून ५०० केव्हीए पर्यंत कपात.

३) श्री सिद्धबली इस्पात लि. ताडाली एमआयडीसी, जि. चंद्रपूरचा प्रकल्प बंद. विजेची ५ हजार केव्हीए ते १५०० केव्हीए पर्यंत कपात.

४) भाग्यलक्ष्मी स्टील प्रा. लि., एमआयडीसी जालना. विजेची ६६ हजार केव्हीए वरून ४५ हजार केव्हीए पर्यंत कपात.

५) ओम साईराम स्टील प्रा. लि., एमआयडीसी जालना. ४५ हजार केव्हीए वरून ३० हजार केव्हीए पर्यंत कपात.

६) राजुरी स्टील प्रा. लि., एमआयडीसी जालना. वीज कपात १३५०० केव्हीए वरून १० हजार केव्हीए पर्यंत.

- गेल्या काही वर्षांत दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेले महाराष्ट्रातील उद्योग

१) एमआय अलॉय वाडा (जि. पालघर) येथून सिल्व्हासा येथे.

२) बलबीर स्टील वाडा येथून वापी येथे.

३) के. सी. फेरो, वाडा येथून सिल्व्हासा येथे. सिल्व्हासा येथे हनुमान स्टील आणि ट्यूब्स ट्यूब्स नावाने नवीन कंपनी सुरू.

४) युनायटेड इंजि वर्क्स वाडा येथून दादरा येथे.

५) स्पायडर मॅन, वाडा येथून दमण येथे. दमणमध्ये श्री साई नावाने कंपनी सुरू.

६) बाबा मुगीपा, वाडा येथून राजस्थानला स्थलांतरित.

७) सरलिया नागपूर येथून छत्तीसगडला स्थलांतरित.

८) मीनाक्षी नागपूर येथून कर्नाटक आणि इंदूर येथे स्थलांतर.

९) रेजिंट जालनाहून सिल्वासा येथे स्थलांतरित.

१०) गणपती इस्पात सिल्व्हासा येथे स्थलांतरित.

विदर्भ, मराठवाडा आणि डी प्लस झोनमध्ये पूर्णत: बंद झालेले महाराष्ट्रातील स्टील उद्योग

१) माउली स्टील इंडस्ट्रीज, जालना

२) अंबरिश इस्पात प्रा. लि., जालना.

३) नीलेश स्टील, जालना.

४) भद्रा मारुती, जालना.

५) मक्रांती स्टील, जालना

६) महावीर मेटल प्रा. लि. औरंगाबाद.

७) असोसिएट स्टील, नागपूर.

८) टॉप वर्थ ऊर्जा आणि मेटल लि., नागपूर.

९) श्री सुषमा फेरस, वाडा. (जि. पालघर)

१०) रेड फ्लेम अलॉय, वाडा.

११) सर्वम स्टील, वाडा.

१२) सुविकास स्टील ॲण्ड अलॉय प्रा. लि., वाडा.

१३) अष्टविनायक इस्पात प्रा. लि., वाडा.

१४) जय ज्योतवली स्टील्स प्रा. लि., वाडा.

१५) गोयल अलाईड ॲण्ड स्टील इंडस्ट्रीज, वाडा.

१६) भुवलका स्टील इंडस्ट्रीज, वाडा.

१७) भवानी इस्पात प्रा. लि., वाडा.

१८) श्री वैष्णव इस्पात प्रा. लि., वाडा.

१९) श्री वैष्णव स्टील इंडस्ट्रीज प्रा. लि., वाडा.

२०) विस्तार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लि., वाडा.

२१) गुरुनानक मेटल वर्क्स, वाडा.

२२) हिरा स्टील इंडस्ट्रीज, वाडा.

२३) हरी स्टील इंडस्ट्रीज, वाडा.

२४) जय महालक्ष्मी इस्पात प्रा. लि., वाडा.

२५) माँ चिंतापूर्णी प्रा. लि., वाडा.

२६) श्री विंध्यवासिनी आयर्न इंडिया प्रा. लि., वाडा.

२७) रामदाद इस्पातनगर.

२८) प्लाझा स्टील, वाडा.

२९) सिल्व्हर आयर्न ॲण्ड स्टील, वाडा.

३०) एसडीएम, वाडा.

३१) वीर अलॉय, नगर.

३२) विराट इस्पात, वाडा.

३३) अरिहंत इस्पात, जालना.

३४) सोला मेटल, वाडा.

३५) जय जोतवली, वाडा.

३६) सुमो इस्पातनगर.

Web Title: 36 steel industries in the state shut down due to high electricity rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.