जिल्ह्यात ३६ हजारावर कार्ड धारकांनी उचलले दुसऱ्या दुकानातून रेशन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:14+5:302020-12-22T04:08:14+5:30
पोर्टेबिलिटीचा घेतला लाभ : कोरोनाच्या काळात वाढला वापर एकूण रेशन कार्ड - ७,७०,०३१ पार्टेबिलिटीचा लाभ घेतलेले ३६,३१९ लोकमत न्यूज ...
पोर्टेबिलिटीचा घेतला लाभ : कोरोनाच्या काळात वाढला वापर
एकूण रेशन कार्ड - ७,७०,०३१
पार्टेबिलिटीचा लाभ घेतलेले ३६,३१९
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात तब्बल ३६,३१६ रेशन कार्ड धारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेत आपल्या नेहमीच्या रेशन दुकानाव्यतिरिक्त दुसऱ्या रेशन दुकानातून धान्य उचलले.
केंद्र सरकारने एक देश एक रेशन कार्ड ही संकल्पना मांडली हाेती. यानुसार ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे तो, देशातील कुठल्याही रेशन दुकानातून रेशनचे धान्य उचलू शकतो. यावर आधीपासूनच काम सुरु होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान या योजनेची गरज अधिक निर्माण झाली, आणि ही योजना अमलात आली. नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात एकूण ७ लाख ७० हजार ३१ रेशन कार्ड आहेत. यापैकी ३६,३१६ रेशन कार्ड धारकांनी या महिन्यातील रेशन आपल्या नेहमीच्या दुकानातून न उचलता दुसऱ्या दुकानातून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी शहरात २९,२१३ तर ग्रामीण भागातील ७,१०६ कार्ड धारकांचा समावेश आहे.
बॉक्स
शहरात वापर जास्त
पोर्टेबिलिटीचा वापर हा कारोना काळामुळे वाढला. यातही शहरात याचा जास्त वापर होतो. कारण शहरात नोकरी व कामाच्या शोधात येणाऱ्या स्थलांतर मजुरांचे प्रमाण अधिक आहे. पोर्टेबिलिटीचा लाभ त्यांना अधिक होत आहे. यात बाहेर राज्यातील कार्ड धारकांसह जिल्ह्यातील व इतर तालुक्यातून आलेल्यांचाही समावेश आहे.
पारदर्शकता वाढली
एकूणच रेशन दुकानातून धान्य घेत असताना आता अधिक पारदर्शकता वाढली आहे. प्रत्येक रेशन दुकानात पॉस मशीन आहेत. रेशन दुकानातील प्रत्येक धान्य वाटपाची माहिती ही अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येते. पोर्टेबिलिटीचा नाागिरक लाभ घेताहेत. अद्याप कुणाकडून काहीही तक्रारी आलेल्या नाहीत.
भास्कर तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी