वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेलाईनसाठी ३७९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:09 AM2018-02-07T00:09:48+5:302018-02-07T00:13:15+5:30
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पासाठी ३७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रेल्वेच्या पिंकबूकमध्ये विदर्भ व मराठवाड्यातील महत्वाकांक्षी २७० किलोमीटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन प्रकल्पासाठी ३७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हा प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. परिणामस्वरुप या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद केली जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भ व मराठवाडा क्षेत्राच्या सर्वांगिन विकासाला चालना मिळेल.
या रेल्वे लाईन्ससाठीही मिळाला निधी
राजनांदगाव-नागपूर थर्ड लाईन - ३७५ कोटी.
वर्धा-नागपूर थर्ड लाईन - ४५ कोटी.
इटारसी-नागपूर थर्ड लाईन - १०५ कोटी.
वर्धा-नागपूर फोर्थ लाईन - ३५ कोटी.
छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईन - ७१ कोटी.
अमरावती-नरखेड नवीन लाईन - १८ कोटी.
वडसा-देसाईगंज नवीन लाईन - १०० कोटी.
गोधनी-कळमना कॉर्ड लाईन - १४ कोटी.
तिगाव-चिचोंडा थर्ड लाईन - ३५.२५ कोटी.
वर्धा-बल्लारशा थर्ड लाईन - ५५ कोटी.
जबलपूर-बालाघाट-कटंगी ब्रॉडगेज - २१० कोटी.
छिंदवाडा-मंडला फोर्ट ब्रॉडगेज लाईन - ७५ कोटी.
कळमना-नागपूर डबलिंग - २.८५ कोटी.
दुर्ग-राजनांदगाव थर्ड लाईन - १२.३० कोटी.
इतवारी अतिरिक्त लुप लाईन - ९० लाख.
नागभीड-नागपूर ब्रॉडगेज लाईन - १००० रुपये.