नोकरानेच लावला चुना, ३.८० लाखांचे लॅपटॉप लंपास
By योगेश पांडे | Published: January 31, 2024 04:56 PM2024-01-31T16:56:36+5:302024-01-31T16:57:04+5:30
७ सप्टेंबर २०२३ ते २८ जानेवारी या कालावधीत बादलने शेख यांच्या गोदामाचे कुलूप उघडून वेळोवेळी लॅपटॉप गायब केले.
नागपूर : संगणक विक्रीच्या दुकानात काम करणाऱ्या एका नोकरानेच मालकाला गंडा घातला व गोदामातील ३.८० लाखांचे लॅपटॉप लंपास केले. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अजहर अहमद शेख (४४, ऑरेंजसिटी टॉवर, धंतोली) यांचा लॅपटॉप विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे बादल अण्णाजी वाघ (२०, सरस्वती नगर, तकिया) हा नोकर म्हणून काम करत होता. १७ सप्टेंबर २०२३ ते २८ जानेवारी या कालावधीत बादलने शेख यांच्या गोदामाचे कुलूप उघडून वेळोवेळी लॅपटॉप गायब केले. त्यावेळी शेख यांनी लॅपटॉपची मोजणी केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. बादलने या कालावधीत डेल, ॲसुस या कंपन्यांचे ३.८० लाखांचे लॅपटॉप चोरले. शेख यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व बादलला अटक करण्यात आली. त्याने या लॅपटॉपची विक्री कुणाला केली याची चौकशी सुरू आहे.