जिल्ह्यातील रस्ते बांधकामासाठी ३८.३० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:13+5:302021-04-03T04:07:13+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाने ३०५४ हेड अंतर्गत ३८.३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर क ...
नागपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाने ३०५४ हेड अंतर्गत ३८.३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर क वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५ कोटी ७० लाख रुपये मंजूर केले आहेत.
३०५४ या हेड अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास, दुरुस्ती करण्यात येते. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. समितीने १४१ कामांना मंजुरी दिली आहे. तर क वर्ग तीर्थक्षेत्राच्या ५८ कामांनाही मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही कामे लवकरच सुरू होतील, असा दावा जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केला आहे. ३०५४ च्या कामांचा सर्वाधिक निधी हा पारशिवनी तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. तर क वर्ग तीर्थक्षेत्राचा सर्वाधिक निधी नागपूर ग्रामीण तालुक्याला मिळाला आहे.
- तालुकानिहाय कामांचा निधी
तालुका ३०५४ हेडची कामे क वर्ग तीर्थक्षेत्राची कामे
काटोल २ कोटी ४० लाख ५५ लाख
नरखेड २ कोटी ३० लाख ४० लाख
सावनेर ४ कोटी ३५ लाख २० लाख
पारशिवनी ५ कोटी ८० लाख ५० लाख
मौदा ३ कोटी २५ लाख ४० लाख
रामटेक २ कोटी ४५ लाख ७० लाख
कुही १ कोटी ५५ लाख २० लाख
कामठी ३ कोटी ५ लाख ४० लाख
उमरेड १ कोटी ७५ लाख ३० लाख
हिंगणा ३ कोटी ३० लाख ७० लाख
नागपूर ३ कोटी ७५ लाख ८५ लाख
भिवापूर १ कोटी १० लाख २० लाख
कळमेश्वर ३ कोटी २५ लाख ३० लाख