नागपुरात धावणार १७६ इलेक्ट्रिक बसेस; लवकरच होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 01:36 PM2022-02-16T13:36:14+5:302022-02-16T13:40:00+5:30

मनपाच्या परिवहन विभागाचा वर्ष २०२१-२२ चा १७८.०८ कोटींचा सुधारित व २०२२-२३ या वर्षाचा ३८४.११ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना मंगळवारी समितीच्या बैठकीत सादर केला.

384 crore budget of nmc transport department submitted, 176 e-bus will be running on nagpur road | नागपुरात धावणार १७६ इलेक्ट्रिक बसेस; लवकरच होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल

नागपुरात धावणार १७६ इलेक्ट्रिक बसेस; लवकरच होणार ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल

Next
ठळक मुद्देमनपाच्या परिवहन विभागाचा ३८४.१३ कोटींचा अर्थसंकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपाच्या ‘आपली बस सेवे’च्या माध्यमातून शहरात सध्या ३६१ बसेस धावत आहेत. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडकडून १५ इलेक्ट्रिक मिडी बस मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून ४० इलेक्ट्रिक मिडी बस व पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून प्राप्त निधीतून ११५ इलेक्ट्रिक बस तसेच ६ तेजस्विनी बस अशा एकूण १७६ इलेक्ट्रिक बसेस लवकरच शहरात धावणार आहेत. यासाठी परिवहन विभागाने २३८.८९ कोटींची तरतूद केली आहे.

मनपाच्या परिवहन विभागाचा वर्ष २०२१-२२ चा १७८.०८ कोटींचा सुधारित व २०२२-२३ या वर्षाचा ३८४.११ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांना मंगळवारी समितीच्या बैठकीत सादर केला. यावेळी सदस्य रूपा राय, सोनाली कडू, सदस्य नितीन साठवणे, नागेश मानकर, शेषराव गोतमारे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम व जनसंपर्क अधिकारी अरुण पिंपरूडे आदी उपस्थित होते.

परिचालनासाठी शहर परिवहन निधी

परिवहन सेवेच्या परिचालनाकरिता शहर परिवहन निधी तसेच महसुलाच्या जादा शिल्लकीचा विनियोग करण्याकरिता महसूल राखीव निधी या नावाने स्वतंत्र शिर्ष उघडण्यात आले आहे. तसेच परिवहन सुधारणा निधी स्थापन करण्यात आल्याची माहिती रवींद्र भेलावे यांनी दिली.

कोरोनामुळे प्रवासी घटले

कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. ४३२ पैकी ३६१ बसेसचे संचालन सुरू आहे. दैनिक बसेसच्या ४६०० फेऱ्या सुरू आहेत. आधीच्या तुलनेत आपली बसचे दैनंदिन प्रवासी संख्या १.६० लाखावरून ७१ हजारांवर आली आहे. यामुळे महसुलात घट झाली आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबी

- पहिल्या टप्प्यात ११५, तर दुसऱ्या टप्प्यात १०० अशा २१५ इलेक्ट्रिक बस धावणार

- परिवहन विभागाची १४५ कोटींची जादाची मागणी

- लकडगंज येथे मातृशक्ती बस आगाराची निर्मिती

- इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारणार

- वाठोडा बस डेपोसाठी ८ कोटींची तरतूद

Web Title: 384 crore budget of nmc transport department submitted, 176 e-bus will be running on nagpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.