कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना आठ बाजारात व्यवसायाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 10:50 PM2020-04-16T22:50:23+5:302020-04-16T22:51:19+5:30

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानंतर कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना शहरातील नवीन आठ बाजारात व्यवसायाची परवानगी मिळाली आहे.

39 Adtiye in Cotton market holdings allowed to trade in eight markets | कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना आठ बाजारात व्यवसायाची परवानगी

कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना आठ बाजारात व्यवसायाची परवानगी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, शनिवारपासून बाजार भरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानंतर कॉटन मार्केटमधील ३९ अडतियांना शहरातील नवीन आठ बाजारात व्यवसायाची परवानगी मिळाली आहे. यशवंत स्टेडियम धंतोली, ग्रेट नाग रोड, नागनदीजवळ भोला गणेशजवळ, टायगर गॅप मैदान सदर, ललित कला मैदान चंदननगर, कलोडे महाविद्यालय बेलतरोडी रोड, एनआयटी मैदान नरेंद्रनगर, भगवाननगर मैदान पोस्ट ऑफिसजवळ आणि क्रीडा संकुल, पार्किंगची जागा, मानकापूर अशी बाजाराच्या जागांची नावे आहेत.
आठ बाजारात पाच जणांच्या अडतियांच्या आठ समूहाला व्यवसायाची परवानगी दिली आहे. शुक्रवारी भाजी बाजार नियमित बंद असल्याने शनिवारपासून सकाळी ८ पासून दुपारी २ वाजेपर्यंत बाजारात खरेदी-विक्री व्यवहार होणार आहे. दोन वाहनांमध्ये कमीतकमी ५० फूटाचे अंतर आवश्यक राहील. प्रत्येक अडत्याला जास्तीत जास्त दोन वाहनांमध्ये भाजी आणण्यास परवानगी राहील. भाजी वाहतूक करणारे वाहन तात्काळ खाली करून रवाना करण्यात येईल. त्याठिकाणी कुणीही चिल्लर भाजी विक्रीकरिता दुकान लावणार नाही. प्रत्येक अडत्याला ओळखपत्र व आदेशाची प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. भाजीची वाहतूक करणे सुकर व सोयीचे होईल या दृष्टीने वाहतूक करणाºया वाहनांना फलक लावण्यात यावे आदींसह अनेक अटींचे पालन अडतियांना करावे लागेल.
कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महात्मा फुले भाजी बाजार (कॉटन मार्केट) खरेदी-विक्रीदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता भाजी विक्रीसाठी बंद केला होता. तेव्हापासून भाज्या उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि अडतियांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे महात्मा फुले सब्जी फ्रूट अडतिया असोसिएशनने १४ एप्रिलला व्यवसाय करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात आठ ठिकाणी भाज्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्याची परवानगी गुरुवारी दिली.
यापूर्वी मनपा आयुक्तांनी शहरात सुरू केलेले काही बाजार सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्याने आणि अतोनात गर्दीमुळे बंद केले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश देऊन काही बाजार सुरू केले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होईल, शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार नाही, असे असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

Web Title: 39 Adtiye in Cotton market holdings allowed to trade in eight markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.