SSC Exam : बोर्डाची दहावीची परीक्षा ३ मार्चपासून : ६९२ केंद्रावर १लाख ८७ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 08:50 PM2020-02-29T20:50:17+5:302020-02-29T20:55:31+5:30
SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. नागपूर विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ८७ हजार ७९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला येत्या ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. नागपूर विभागातून या परीक्षेसाठी १ लाख ८७ हजार ७९७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. परीक्षेसाठी विभागात ६९२ केंद्र बनविण्यात आले आहे. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार ८७०४९ विद्यार्थिनी, ९९७३६ विद्यार्थी व १२ तृतियपंथी विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
शनिवारी परीक्षेसंदर्भात बोर्डाच्या कार्यालयात व परीक्षा केंद्रावर तयारी सुरू होती. परीक्षे दरम्यान केंद्र संचालक व कक्ष पर्यवेक्षक यांना काय करायचे आहे, याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विभागातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तयारी पूर्ण झाली आहे. कस्टडी केंद्रावर परीक्षेचे साहित्य पाठविण्यात आले आहे. सोबतच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही परीक्षेसाठी समीक्षा बैठक घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एक दक्षता पथक बनविण्यात आले आहे.
नागपूर बोर्डातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
जिला परीक्षार्थी
भंडारा २००८०
चंद्रपूर ३४२८७
नागपुर ६९६०७
वर्धा १९९१५
गडचिरोली १७४८९
गोंदिया २३४१९