नागपूरच्या मनोरुग्णालयात २० दिवसात ४ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:02 AM2018-01-23T00:02:30+5:302018-01-23T00:04:35+5:30
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या मते, प्रत्येक महिन्यात दोन रुग्णाचा मृत्यू होत आहे. त्यामुळे वर्षभरात मृत्यूचा आकडा २४ ते २६ झाला आहे. याचे कारण रुग्णालयात मेडिसीन फिजिशियन नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी आरोग्य उपसंचालकांनी येथे प्रतिनियुक्तीवर एका फिजिशियनची नियुक्ती केली होती, तरीसुद्धा येथे रुग्णांचा मृत्यू होतच आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीच्या २० तारखेपर्यंत येथे उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर बोट दाखविले जात आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची देखभाल नीट होत नसल्याची चर्चा आहे तसेच डॉक्टरांची मानसिकतासुद्धा येथे केवळ दीड ते दोन तास काम करण्याची आहे.
वैद्यकीय सुविधांचा अभाव
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले की, रुग्णालयात फिजिशियनकडून प्राथमिक उपचार केले जातात, परंतु रुग्ण हे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात. त्या अनुषंगाने रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. रुग्णाला स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात येते. रुग्णालयात येण्यापूर्वी जर रुग्णाची वैद्यकीय तपासणी झाल्यास त्याच्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात.