ऑक्सिजनचे ४ टँकर रेल्वेने पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:08+5:302021-05-09T04:08:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्गकाळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजनपुरवठ्यासाठी वायुदल व रेल्वेच्या मदतीने ओदिसा राज्यातून चार ऑक्सिजन टँकर ...

4 tankers of oxygen reached by train | ऑक्सिजनचे ४ टँकर रेल्वेने पोहोचले

ऑक्सिजनचे ४ टँकर रेल्वेने पोहोचले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संसर्गकाळामध्ये जीवनदायी ठरलेल्या ऑक्सिजनपुरवठ्यासाठी वायुदल व रेल्वेच्या मदतीने ओदिसा राज्यातून चार ऑक्सिजन टँकर शहरात पोहोचले आहेत. ५८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा झाला आहे. शनिवारी एकूण १६९ मेट्रिक टनपुरवठा करण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी वायुदलाच्या विशेष विमानाने चार टँकर ओदिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरनजीकच्या अंगूळ येथील स्टील प्लांटसाठी रवाना करण्यात आले होते. ७ मेच्या रात्री ३ वाजता रेल्वेस्थानकावर हे चारही टँकर प्राप्त झाले आहेत. भिलाई येथून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याव्यतिरिक्त हा ऑक्सिजन नागपूर शहराला मिळाला आहे. उद्यापर्यंत आणखी चार टँकर रेल्वेने येण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, शनिवारी भिलाई व अंगूळ येथून एकूण १६९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला ६२ मेट्रिक टन व मेडिकल व अन्य रुग्णालयांना ७१ मेट्रिक टनाचे वितरण करण्यात आले आहे.

३ हजार ८६७ रेमडेसिविर प्राप्त

नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाला शनिवारी ३ हजार ८६७ रेमडेसिविर प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सर्व मागणी करणाऱ्या हॉस्पिटलला याचे वितरण केले जाणार आहे. तथापि, हॉस्पिटलकडून होणारी मागणी आणि पुरवठा अत्यंत कमी असून, यासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.

२९ हजार लसीची खेप प्राप्त

नागपूर जिल्ह्यामध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लस डोसची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाला शुक्रवारी उशिरा २९ हजार लस डोस प्राप्त झाले आहेत. यामधील १४ हजार ५०० शहर व १४ हजार ५०० ग्रामीण भागात वितरित करण्यात आले असून, या उपलब्ध लस डोसमधून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात या लसीदेखील मागणी नोंदविली आहे.

Web Title: 4 tankers of oxygen reached by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.